News

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. असे असताना राज्य आणि केंद्र सरकारवर यामुळे टीका केली जात होती. आता याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट करून मोठी माहिती दिली आहे.

Updated on 22 August, 2023 11:16 AM IST

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. असे असताना राज्य आणि केंद्र सरकारवर यामुळे टीका केली जात होती. आता याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट करून मोठी माहिती दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. त्यांच्यासोबत चालू घडामोडींवर चर्चा केली.

केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे.

₹2410 प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल. अशी घोषणा त्यांनी केली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का.? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तसेच आता या प्रश्नासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे हे देखील दिल्ली दौऱ्यावर आहेत. दरम्यान कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्कात आकारल्याने कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत. शिवाय त्यांच्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरलीय.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अहमदनगरच्या राहुरी बाजार समितीतील कांद्याचे लिलाव पाडले बंद तसेच नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यातील मेशीमध्ये आंदोलन करून अध्यादेशाची होळी देखील केली. यामुळे यावरून शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

वस्त्रोद्योग व्यवसायाशी निगडीत अनुदान केंद्र सरकारकडून बंद, व्यवसाय मोठ्या संकटात, राजू शेट्टी यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

English Summary: Breaking! Devendra Fadnavis took a big decision for the onion producing farmers, made a big announcement, the farmers will get relief.?
Published on: 22 August 2023, 11:16 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)