Sugar Export: गव्हाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. याबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र असं असताना आता केंद्र सरकार साखरेच्या निर्यातीवरदेखील बंदी घालण्याच्या तयारीत आहे. साखरेची वाढती किंमत नियंत्रणात आणण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र यातून साखर उत्पादक कारखाने व शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
ब्राझील देशानंतर भारत हा सर्वाधिक साखर उत्पादक देश म्हणून ओळखला जातो. यावर्षी साधारण चारशे लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होणे अपेक्षित आहे. मात्र दुसरीकडे देशातील साखरेची वार्षिक गरज पाहता ती 250 लाख मेट्रिक टन एवढी आहे. त्यामुळे साखरेचे विक्रमी उत्पादन झाल्याने साखर निर्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढेल.
मोठ्या प्रमाणात जर साखर निर्यात झाली तर स्वदेशात तिच्या किमती वाढतील यामुळे केंद्र सरकारने वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी साखर निर्यातीवर बंद घालण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. असे वृत्त 'रॉयटर्स'ने दिले आहे. याशिवाय साखरेची निर्यात 10 मिलियन टनापर्यंत मर्यादित असावी याकडेही सरकारचे लक्ष आहे.
महिलांनो मासिक पाळीची चिंता सोडा; या पदार्थांमधून मिळेल आराम
जर साखर निर्यात बंद झाली तर याचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना आणि सोबतच साखर उत्पादक कारखान्यांना बसणार आहे. आतापर्यंत देशातील साखर कारखान्यांनी सुमारे 75 लाख मेट्रिक टन साखर निर्यात केली आहे. दरवर्षी साखरेची निर्यात मोठ्या प्रमाणावर होत असते. 2020-21मध्ये सुमारे 70 लाख मेट्रिक टन साखरेची निर्यात झाली होती,
तसेच 2017-18 साली जवळपास 62 लाख मेट्रिक टन साखरेची निर्यात करण्यात आली होती. प्रतिवर्षी साखरेची होत असलेल्या निर्यातीच्या 80 टक्के साखर ही महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यातून होते. भारत देशातून, इंडोनेशिया, अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, यूएई,दक्षिण आफ्रिका आणि मलेशिया देशांना साखरेची निर्यात केली जाते. जर साखर निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी घातली तर या देशांनादेखील मोठा फटका बसणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
7 pay commission: फिटमेंट फॅक्टरवर आज घेतला जाऊ शकतो मोठा निर्णय,किमान वेतन 26 हजार रुपये होण्याची शक्यता
वजन कमी करताना चुकूनही करू नका 'या' फळांचे सेवन; तज्ञांनी सांगितले नुकसान
Published on: 25 May 2022, 09:57 IST