राज्य सरकारने 100 आणि 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर कायदेशीर व्यवहारातून बाद करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी मिळाल्यानंतर हे स्टॅम्प पेपर बाद करण्यात येतील, असे सांगितले जात आहे.
सध्या 10 हजार रुपयांचे स्टॅम्प पेपर (Stamp Paper) राष्ट्रीय बँकेतून फ्रॅकिंग करून मिळतात. आता 100 आणि 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर देखील राष्ट्रीय बँकेतून फ्रॅकिंग करून मिळतील.
दरम्यान, या निर्णयामुळे गैरव्यवहाराला आळा बसेल आणि सर्वसामान्यांना स्टॅम्प पेपरसाठी रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. स्टॅम्प पेपरचा वापर करार, खरेदी-विक्री, प्रतिज्ञापत्र, इत्यादी कायदेशीर दस्तऐवजांवर केला.
मुद्रांक शुल्क भरण्यासाठी स्टॅम्प पेपर वापरला जातो. नाशिक येथे सरकारी प्रिंटिंग प्रेसमध्ये स्टॅम्प पेपरची छपाई केली जाते. आता छपाईचा खर्च, कागदाचा खर्च आणि सुरक्षेवरील ताण कमी होईल. यासाठी लागणारा छपाईचा खर्च, कागदाचा खर्च आणि सुरक्षेवरील ताण कमी होईल.
तसेच गैरव्यवहाराला आळा बसेल. सर्वसामान्यांना स्टॅम्प पेपरसाठी तासन्तास रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. याचा वापर अनेक ठिकाणी केला जात होता. तसेच यासाठी जास्तीचे पैसे देखील घेतले जात होते.
गाय म्हैस न पाळता तुम्ही हा अत्यंत फायदेशीर दुग्ध व्यवसाय करू शकता, जाणून घ्या..
Published on: 27 September 2023, 02:39 IST