News

गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला असून धरणे देखील भरली आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. असे असताना आता पाऊस काही दिवस विश्रांती घेणार आहे. हंगामाच्या सुरुवातीला पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजाच्या चेहऱ्यावर आता पाऊस उघडत असल्याने समाधान बघायला मिळत आहे.

Updated on 20 July, 2022 3:05 PM IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला असून धरणे देखील भरली आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. असे असताना आता पाऊस काही दिवस विश्रांती घेणार आहे. हंगामाच्या सुरुवातीला पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजाच्या चेहऱ्यावर आता पाऊस उघडत असल्याने समाधान बघायला मिळत आहे.

याबाबत आता हवामानतज्ञ पंजाबरावांचा हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) देखील समोर आला आहे. पंजाबरावांच्या अंदाजानुसार, राज्यात आज म्हणजे 20 जुलैपासून पाऊस ओसरणार असून अनेक ठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे. मात्र असे असले तरी तीन चार दिवसानंतर पुन्हा एकदा मोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे याकडे लक्ष लागले आहे.

यामुळे 23-24 जुलैपासून पुन्हा एकदा राज्यात मोसमी पाऊस जोरदार कोसळणार आहे. आज विदर्भात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे. तसेच आजपासून राज्यातील उत्तर महाराष्ट्रात आणि उर्वरित भागात देखील सूर्याचे दर्शन होणार आहे. त्यानंतर 23, 24 आणि 25 जुलै रोजी राज्यात अनेक भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आता शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार!

तीन दिवस पावसाची उघडीप राहिल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस कोसळणार असल्याचे पंजाबरावांनी सांगितले. पंजाबराव यांनी वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार, 28, 29, 30 जुलै रोजी राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊनच शेतातील कामे करावीत.

महत्वाच्या बातम्या;
काय सांगता! आता मोबाईल अ‍ॅपवर करा जनावरांची विक्री, दुधाचे प्रमाणही समजणार
लाखो रुपये कमवून देणारं पावसाळ्यातील हक्काचे पीक, जाणून घ्या तिळाची लागवड
लाथ मारीन तिथे पाणी काढीन! बीडच्या पठ्याने दुष्काळी भागात केली सफरचंदाची बाग

English Summary: break from rain few days Heavy rain again date, Punjabrao predicted...
Published on: 20 July 2022, 03:05 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)