News

अमेरिकेच्या कृषी विभागाने दक्षिण अमेरिकेतील ब्राझील, अर्जेटिना आणि पेरुग्वे या देशांमधील सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली आहे. याचे पडसाद लगेच सोयबीन बाजारावर आहेत. दरम्याान अमेरिका आणि चीनच्या वायदे बाजारात सोयबीनच्या दरात सुधारणा झाली असून सोयापेंड आणि सोयतेलाच्याही दरात सुधारणा झाली आहे. युएसडीने यापुर्वीच्या अंदाज ब्राझीलमध्ये 1 हजार 390 लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता.

Updated on 12 February, 2022 2:02 PM IST

अमेरिकेच्या कृषी विभागाने दक्षिण अमेरिकेतील ब्राझील, अर्जेटिना आणि पेरुग्वे या देशांमधील सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली आहे. याचे पडसाद लगेच सोयबीन बाजारावर आहेत. दरम्याान अमेरिका आणि चीनच्या वायदे बाजारात सोयबीनच्या दरात सुधारणा झाली असून सोयापेंड आणि सोयतेलाच्याही दरात सुधारणा झाली आहे.  युएसडीने यापुर्वीच्या अंदाज ब्राझीलमध्ये 1 हजार 390 लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता.

मात्र फेब्रुवारीच्या अहलवालात येथील सोयाबीन उत्पादन 1 हजार 340 लाख टनांवर पोचेल असे म्हटले आहे. असे झाल्यास हे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत खूपच कमी राहील. मात्र येथील काही व्यापारी संस्थांच्या मते सोयाबीन उत्पादन यापेक्षाही कमी असेल. अर्जेटीनातील सोयाबीन उत्पादनाचा  अंदाजही 435 लाख टनांवरुन 450 लाख टनंपर्यंत कमी करण्यात आला आहे. अर्जेटीनात  मागील  हंगामात 462 लाख टन सोयाबीन उत्पादन झाले होते. म्हणजेच यंजा अर्जेटिना  गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी उत्पादन राहील. दक्षिणेतील पेरुग्वे देशातील सोयाबीन उत्पादनाच्या अंदाजात कपात करण्यात आली आहे.

युएसडीएच्या मते पेरुग्वे देशातील सोयाबीन उत्पादन झाले होते. म्हणजेच यंदा अर्जेटिनात मागील वर्षाच्या  तुलनेत कमी उत्पादन राहील. दक्षिणेतील पेरुग्वे देशातील सोयाबीन उत्पादनाच्या  अंदाजात कपात करण्यात आली आहे. युएसडीच्या मते पेरुग्वे देशातील सोयाबीन उत्पादन 63 लाख टनांवर स्थिरावेल, मागील हंगामात येथे 99 लाख टन सोयबीन उत्पादन झाले होते. युएसडीएने अमेरिकेतील सोयाबीन उत्पादनाचा 1 हजार 207 लाख टनांवर कायम ठेवला आहे. मागील हंगामात अमेरिकेत 1 हजार 147 टन सोयाबीन उत्पादन झाले होते. याचच अर्थ असा की यंदा अमेरिकेतील सोयाबीन उत्पादनात वाढ होणार आहे.

 

आधीच ब्राझील, अर्जेटीना आणि पेरुग्वे या देशात सोयाबीन उत्पादन घटीच्या अंदाजाने आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर  तेजीत होते. आता युएसडीएनेही याला पुष्टी दिल्याने बाजारावर लगेच परिणाम जाणवला. महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक देशात उत्पादन  घटीचा अंदाज युएसडीएने व्यक्त केल्यामुळे आतंरराष्ट्रीय सोयाबीन मजबूत स्थितीत आहे.  सोयापेंड आणि सोयातेलाचा बाजारही सुधारला आहे. त्यामुळे याचा आधार देशातील सोयाबीन बाजारालाही होईल, देशातील सोयाबीन दर स्थिर राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

 

बाजारावर परिणाम

अमेरिकेच्या वायदे बाजारात गुरुवारी सोयाबीनचा दर विक्रमी 1623 सेंट प्रति बुशेल्सवर पोचला होता.  तर शुक्रवारी बाजार 1574 सेंटवर बंद झाला. मार्चचे वायदे 1584 सेंट प्रतिबुशेल्सनी झाले. सोयापेंडचे व्यवहार 455.7 डॉलर प्रतिटनाचे झाले. अमेरिकेच्या वायदे बाजारासह चीनच्या बाजारातही सोयाबीनच्या वायद्यात सुधारणा झाली.

English Summary: Brazil, Argentina soybean production to decline compared to last year - USDA
Published on: 12 February 2022, 02:01 IST