1. बातम्या

आता व्हॉट्स ऐपवरून होणार गँस बुकिंग; सात कोटी ग्राहकांना होणार फायदा

सध्या तंत्रज्ञानाने प्रत्येक क्षेत्रात प्रवेश केला आहे. सर्व क्षेत्र डिजिटल झाली आहेत. आता डिजिटलने एलपीजी गॅसची कामे होणार आहेत. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटडने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
photo jagran

photo jagran


सध्या तंत्रज्ञानाने प्रत्येक क्षेत्रात प्रवेश केला आहे. सर्व क्षेत्र डिजिटल झाली आहेत. आता डिजिटलने एलपीजी गॅसची कामे होणार आहेत. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटडने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. या सुविधेचा लाभ साधारण ७.१० कोटी ग्राहकांना मिळणार आहे. या सुविधेच्या अंतर्गत आता बीपीसीएल ग्राहक व्हॉट्स ऐपवरून घरगुती गॅस बुकिंग करू शकतील. बीपीसीएलने जारी केलेल्या आपल्या निवदेनात म्हटले आहे की, भारत गॅसचे (बीपीसीएलच्या एलपीजी ब्रँड नाव) देशभरात असलेले ग्राहक व्हॉट्सअॅपवरून घरी बसून सिलिंडर बुक करू शकतात.  कंपनीनुसार, हे बुकिंग व्हॉट्सऐपवर बीपीसीएल स्मार्टलाईन नंबर १८००२२४३४४ वर करता येणार आहे. 

ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुन बुकिंग करावे लागणार आहे. बीपीसीएलचे अधिकारी अरुण सिंह यांनी सांगितले की, एलपीजी बुकिंग करण्यासाठी या तरतूदीमुळे ग्राहकांना अधिक सोपे होईल. व्हॉट्सऐपचा वापर आता सामान्य लोकांमध्ये खूप होत आहे. युवक असो किंवा वयस्कर प्रत्येकजण त्याचा वापर ककरतो आणि या नव्या सुरुवातीने आम्ही आमच्या ग्राहकांना जवळ पोहचू शकतो.  व्हॉट्सऐपवरुन बुकिंग केल्यानंतर ग्राहकांना बुकिंगचा मेसेज मिळेल, यासह त्यांना एक लिंक देखील मिळेल. ज्यावर ते डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, युपीआय आणि अमेझॉन सारख्या इतर अॅप्सद्वारे देखील पैसे भरू शकतील. एलपीजी डिलीव्हरीवर लक्ष ठेवणे आणि त्याबद्दल ग्राहकांकडून त्यांचा अभिप्राय घेणे यासारख्या नवीन उपक्रमाबाबत विचारही कंपनी करत आहे. येत्या काही दिवसांत ग्राहकांना सुरक्षा जागरूकतासह अधिक सुविधा देईल, असेही टी.पीतांबरम यांनी सांगितले.

English Summary: bpcl launches new feature; customer can book cylinder by whats app Published on: 28 May 2020, 02:18 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters