1. बातम्या

दापोली कृषी विद्यापीठाचा शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व संशोधनासाठी इस्कॉनसोबत करार

KJ Maharashtra
KJ Maharashtra
krushi vidyapeeth dapoli

krushi vidyapeeth dapoli

 दापोली येथील डॉ.  बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाने पालघर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व तसेच शेतीच्या क्षेत्रात मूलगामी संशोधन यासाठी इस्कॉन सोबत पाच वर्षाचा सामजस्य करार करण्यात आला आहे

या अंतर्गत शेतीमध्ये विविध प्रकारचे अत्याचार प्रयोग केले जाणार आहेत. तसेच शेती क्षेत्रात आधुनिक व येऊ घातलेल्या नव्या संशोधनांचा आधारे शेतकऱ्यांचा विकास कसा होईल यावर या समाजाच्या कार्याच्या माध्यमातून काम केले जाणार आहे.

 जिल्ह्यातील वाडा येथील इस्कॉन, गोवर्धन इको व्हिलेज गालतरे येथे एक कार्यक्रम घेऊन या दोन्ही संस्थांच्या वतीने कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत, कृषी संशोधनाचे संचालक डॉ. पराग हळदणकर, ब्रजहरि दास व सनत्कुमार दास यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

 या झालेल्या कार्यक्रमाला पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांची उपस्थिती होती. या कराराअंतर्गत भाताचे सेंद्रिय शेती, औषधी वनस्पतींची लागवड, सुधारित जातीच्या बांबूंचे लागवड व त्यावरील आधारित लघु उद्योग, बारमाही सुगंधी चाफ्याची लागवड आणि त्यापासून आत्तार निर्मिती उद्योग, विविध फळे व फुलांची शेती, बीज बँक, जंगलातील औषधी व रानभाज्या आणि खाणे योग्य फळांची लागवड, पिकांचे संरक्षण आणि संवर्धन करणे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ विकसित केलेल्या फळझाडे आणि फुलझाडे आणि कपिला वाणाच्या गाईची जोपासना करणे इत्यादी कामे या कराराच्या माध्यमातून केले जाणार आहेत.

तसेच या करारांतर्गत आदिवासी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांचे सर्वांगीण उन्नती करणे अशी उद्दिष्ट्ये समोर ठेवण्यात आले आहे.

 या करारांतर्गत कोणते उपक्रम राबवले जाणार?

 या समाजाचा करारांतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणे तसेच त्यांच्या शेता मालाचे मूल्यवर्धन करणे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा शेती संशोधनाचा प्रचार व प्रसार करणे, शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना अवगत करणे असे उपक्रम या सामंजस्य करारांतर्गतराबवले जाणार आहेत.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters