News

अनेक बॉलिवूड कलाकार आपल्या वेगवेगळ्या अंदाजासाठी चर्चेत असतात. त्यांनी एखादा फोटो सोशल मीडियावर टाकला तर त्याची मोठी चर्चा होते. असे असताना ते आपल्या फिटनेसवर खूपच लक्ष देत असतात. ते बाहेरचे पदार्थ शक्यतो खात नाहीत. तसेच ते आपल्या घरातील बागेत किंवा शेतात भाज्या किंवा फळे लावत असतात. आणि ते पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने पिकवले जाते.

Updated on 14 January, 2022 12:19 PM IST

अनेक बॉलिवूड कलाकार आपल्या वेगवेगळ्या अंदाजासाठी चर्चेत असतात. त्यांनी एखादा फोटो सोशल मीडियावर टाकला तर त्याची मोठी चर्चा होते. असे असताना ते आपल्या फिटनेसवर खूपच लक्ष देत असतात. ते बाहेरचे पदार्थ शक्यतो खात नाहीत. तसेच ते आपल्या घरातील बागेत किंवा शेतात भाज्या किंवा फळे लावत असतात. आणि ते पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने पिकवले जाते. त्यावर कोणतेही औषध मारले जात नाही. यामुळे त्याचा फिटनेस देखील चांगला असतो. तसेच ते आजारी देखील पडत नाहीत. गेल्या काही दिवसात अनेक कलाकार हे शेतीकडे वळाले आहेत. अनेकांनी शेती खरेदी करून त्यामध्ये ते काम करतानाचे फोटो व्हिडिओ शेअर केले आहेत.

यामुळे अनेक कलाकार शेतीकडे वळाले असल्याचे दिसून येते. ऑरगॅनिक फूड घेण्यासाठी सलमान खान अनेकदा शेतात काम करताना दिसतो. त्याच्या पनवेलजवळील फार्महाऊसमध्ये मोठी शेती आहे. लॉकडाऊनच्या काळात तो याच ठिकाणी होता, तसेच येथे त्याने अनेक फळे आणि भाज्या लावल्या असल्याचे सांगितले जाते. तसेच तो भात लागवड देखील करतो. यामुळे त्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा असते. येथे अनेक प्राणी देखील पाळले आहेत. तो स्वतः येथे आला की त्यांची काळजी घेत असतो. तसेच अभिनेत्री प्रिती झिंटाने देखील शेती करण्यास सुरुवात केली आहे.

तिने तिच्या फॉर्मचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये ती म्हणाली होती की ती अधिकृतपणे शेतकरी बनली आहे. प्रिती झिंटाचा तो व्हिडिओ तिच्या सफरचंद फॉर्मचा होता. सफरचंद व्यतिरिक्त स्ट्रॉबेरी, संत्री, पीच, पेरू आणि टोमॅटोचे पीक प्रीती आपल्या बागेत घेते. यावर ती औषधे फवारत नाही. यामुळे ती देखील नैसर्गिक शेती करते. तसेच अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही देखील आपल्या शेतातले व्हिडिओ शेअर करत असते. तिने आपल्या बागेतील भोपळ्याच्या पिकाचा फोटो शेअर केला होता. ती देखील तिच्या फिटनेसवर खूप लक्ष देते. ती देखील आपल्या शेतात काम करत असते. ती भाजीपाला पिकवत असते. शिल्पा शेट्टी आपल्या घरात मातीविरहित बागकामही करते.

तसेच यामध्ये अजून अनेक नावे येतात. यामध्ये सामंथा रुथ प्रभू हिचे देखील नाव यामध्ये घेतले जाते. फॅमिली मॅन 2 फेम सामंथा शाकाहारी आहार घेते. समंथा तिच्या स्वतःच्या घरात मायक्रोग्रीन वाढवते. तसेच हलका आहार घेते. तिला लागणाऱ्या अनेक भाज्या ती घरीच पिकवते. यामुळे बाहेरील भाज्यांचा आपल्या शरीरावर काही परिणाम होत नाही. सध्या अनेक आजार समोर येत आहेत. तसेच अटॅकचे प्रमाण देखील वाढले आहे. यामुळे योग्य आहार घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. यामुळे अनेक कलाकार याकडे आता लक्ष देत आहेत. यामुळे त्याचा फिटनेस देखील चांगला राहण्यास मदत होते.

English Summary: Bollywood actors turn to agriculture, taking 'these' crops as they are beneficial for health
Published on: 14 January 2022, 12:19 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)