News

कृषी निविष्ठा व गुण नियंत्रण तसेच बियाणे पुरवठ्याबाबत आज (दि.18) त्यांनी मंत्रालयात कृषी विभागाचा आढावा घेतला. यावेळी धनंजय मुंडे बोलत होते. या बैठकीला अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग, सहसचिव गणेश पाटील, संचालक विस्तार व सेवा विकास पाटील तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

Updated on 01 September, 2023 6:44 PM IST

मुंबई

राज्यात दिवसेंदिवस बोगस बियाणे, खते, कीटकनाशके यासंदर्भात शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांची नेमकी तक्रार कुठे करायची. हे शेतकऱ्यांना नेमके समजत नाही. त्यासाठी राज्य सरकारने पाऊले उचली आहेत. खते, बियाणे अथवा किटकनाशके यासंदर्भात तक्रार करण्यासाठी राज्य सरकारमार्फत लवकरच व्हॉट्स ॲप क्रमांक जारी करण्यात येणार आहे.

राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत निर्देश दिले आहेत. कृषी निविष्ठा व गुण नियंत्रण तसेच बियाणे पुरवठ्याबाबत आज (दि.18) त्यांनी मंत्रालयात कृषी विभागाचा आढावा घेतला. यावेळी धनंजय मुंडे बोलत होते.

या बैठकीला अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग, सहसचिव गणेश पाटील, संचालक विस्तार व सेवा विकास पाटील तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

कापूस बियाण्यांच्या बाबतीत आढावा घेताना मुंडे म्हणाले की, बियाणे उत्पादनाची परवानगी देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन परवाना प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात यावी, तसेच बियाण्यांच्या तक्रारींबाबत ओडिशाच्या धर्तीवर सर्वसमावेशक ॲप किंवा पोर्टल तयार करण्यात यावे असेही मुंडे यांनी सांगितले.

English Summary: Bogus seed complaints now on WhatsApp Government decision
Published on: 18 July 2023, 06:57 IST