हंगामाच्या शेवटी जी द्राक्षाची बाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खते वापरली त्या रासायनिक खतांमुळे द्राक्षाचे घड जळाले आहेत. हा प्रकार माढा तालुक्यात घडला असल्यामुळे द्राक्षे बागायतदार उत्पादकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. माढा तालुक्यातील बावी गावामध्ये ही घटना घडली असून तेथील शेतकऱ्याचे जवळपास ३५ टन नुकसान झाले आहे. ३ हजार हेक्टरपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर बाग लागवड केली होती जे की याचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाने दिलेली आहे. बोगस रासायनिक खतांमुळे द्राक्षचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बावी गावातील विजय ज्ञानदेव मोरे या शेतकऱ्यासोबत हा विषय घडलेला आहे जे की मोरेंनी कृषी आयुक्तांकडे जाऊन याबाबत तक्रार केली आहे. कृषी विभागाने लगेच घटनास्थळी जाऊन संबंधित खत दुकानाचा परवाना रद्द केला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण :-
माढा तालुक्यातील बावी गावामध्ये द्राक्षांना वापरण्यात आलेल्या रासायनिक खतामुळे द्राक्षाचे घड पूर्ण जळून गेले आहेत. अशा या विचित्र घटनेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना हादराच बसलेला आहे. ३ हजार पेक्षा जास्त हेक्टर क्षेत्रावर द्राक्षाच्या बागांचे यंदा रासायनिक खतामुळे नुकसान झाले आहे अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे. विजय ज्ञानदेव मोरे असे या शेतकऱ्याचे नाव असून त्याने कृषी आयुक्तांकडे जाऊन हायटेक "ग्रीन ऍग्रो टेक" या कंपणीविरुद्ध तसेच संबंधीत खत दुकानदार आहे त्याच्या विरुद्ध पावतीसह रीतसर तक्रार केली आहे. कृषी तज्ञांनी या प्रकरणास गंभीर घेऊन लॅबमध्ये तपासणी केली त्यावेळी त्या खतामध्ये अनेक अशा गोष्टी दिसून आल्या ज्यामुळे त्यांनी दुकानदाराचा परवाना रद्द केला.
लाखो रूपयांचे नुकसान :-
हायटेक "ग्रीन ऍग्रो टेक" या कंपनीच्या जेव्हा रासायनिक खतांची प्रयोगशाळेत तपासणी केली त्यामधून ती खते बोगस असल्याचे समोर आले. माढा तालुक्यातील विजय मोरे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीस जबाबदार ही कंपनी असून त्या कंपनीवर गुन्हा दाखल करून नुकसानभरपाई भेटावी अशी विजय मोरे यांची मागणी आहे. या बोगस खतामुळे विजय मोरे यांचे १२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
70 अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी असल्याची धक्कादायक बाब समोर :-
ऊस या नगदी पिकाकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात द्राक्षाचे उत्पादन घेतले आहे मात्र बोगस खतामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढलेली आहे. मोडनिंब मधील बळीराजा कृषी केंद्रातून विजय मोरे यांनी ग्रीन गोल्ड या कंपनीची विविध प्रकारची रासायनिक खते द्राक्षेसाठी आणली होती. द्राक्षचा अंतिम टप्यात हंगाम असताना रासायनिक खतामुळे द्राक्षचे घड जळाले आहेत जे की ही सर्व बाबी लक्षात आली असताना शेतकऱ्याने लगेच कृषी विभागाशी संपर्क साधला. ज्यावेळी पुण्यातील शासकीय प्रयोग शाळेत खत तपासणी केली त्यावेळी त्या खतात ७० टक्के अन्नद्रव्ये प्रमाण कमी असल्याने ही माहिती माढा तालुक्यातील कृषी अधिकारी भारत कदम यांना दिली आहे.
Published on: 16 March 2022, 06:07 IST