Black Potato: भारतातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये बटाट्याची लागवड केली जाते. फरी पुखराज, कुफरी सिंदूरी, कुफरी चिपसोना, कुफरी अलंकार आणि कुफरी नीलकंठ अशा अनेक सुधारित जातींद्वारे शेतकरी अधिक उत्पादनासह चांगले उत्पन्न घेत आहेत. जर आपण बटाट्याच्या रंगांबद्दल बोललो तर ते पिवळे, गुलाबी किंवा पांढरे असते. पण एक असे बटाटे आहे ज्याबद्दल तुम्हाला कदाचित माहिती नसेल. या बटाट्याच्या जाती रंग काळा असल्याकारणाने याचे नाव ब्लॅक पोटॅटो पडले आहे. त्याचा रंग गडद जांभळ्यापासून काळ्यापर्यंत असतो. हे बटाटे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आज आपण बटाट्याच्या या वेगळ्या जातीबद्दल जाणून घेणार आहोत.
पोषक तत्वे -
पांढऱ्या बटाट्याच्या तुलनेत काळ्या बटाट्यामध्ये अनेक पटींनी जास्त पोषकतत्वे असतात. हा बटाटा मधुमेहाचे रुग्णही खाऊ शकतात. या बटाट्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि फ्लोरिक अॅसिड सर्वाधिक आढळते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर ठरते. याशिवाय हृदयरोग, फुफ्फुसाचे आजार आणि यकृतावरही ते फायदेशीर आहे. अशक्तपणावर मात करण्यासाठीही या बटाट्याला सर्वाधिक पसंती दिली जाते.
या बटाट्याच्या लागवडीबद्दल बोलायचे तर ते जगातील निवडक भागातच शक्य आहे. त्याची प्रामुख्याने लागवड अमेरिकेतील अँडीज पर्वतीय प्रदेशात केली जाते. पण आता भारतातही अनेक भागात ब्लॅक पोटॅटोची लागवड मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.
लागवड पद्धती -
पांढऱ्या बटाट्याप्रमाणे त्याचीही लागवड करता येते. जास्त उत्पादनासाठी त्याची लागवड चिकणमाती किंवा वालुकामय जमिनीत करावी. या बटाट्याची लवकर पेरणी सप्टेंबर महिन्यात आणि उशिरा पेरणी 15 ते 25 ऑक्टोबर पर्यंत करावी. परंतु वेगवेगळ्या राज्यात हवामान व हंगामानुसार अनेक शेतकरी १५ ते २५ डिसेंबरपर्यंत लागवड करतात.
ब्लॅक पोटॅटो हे जास्त उत्पन्न देणारे पीक आहे. बाजारात पांढऱ्या बटाट्याचा भाव 20 ते 25 रुपये किलो आहे. तर या काळ्या बटाट्याची किंमत 100 रुपये प्रती किलो पासून 400 - 500 रुपये प्रती किलो असू शकते.
Published on: 27 November 2023, 03:53 IST