गोंदिया जिल्ह्याचे हवामान काळी मिर्च किंवा मिरेचे उत्पादन घेण्यासाठी योग्य असल्याची माहिती सुप्रसिद्ध वनस्पती तज्ञ डॉ. श्रीराम भुस्कुटे यांनी दिली आहे. भारतामध्ये मुख्यता मिरी व काळी मिर्च चे उत्पादन कर्नाटक, केरळ तसेच महाराष्ट्र राज्यात कोकण विभाग, आसाम व पश्चिम बंगाल इथे घेतले जाते.काळी मिरी च्या झाडांची योग्य वाढ होण्यासाठी उष्ण व दमट हवामानाची गरज लागते. सुप्रसिद्ध वनस्पती तज्ञ डॉ. श्रीराम भुस्कुटे यांनी त्यांच्या आंब्याच्या बागेत काळी मिरी लावण्याचा प्रयोग यशस्वी केलेला आहे.
काळी मिरीच्या झाडांची योग्य वाढ:
काळी मिरी साठी सुमारे १८ ते ३८ डिग्री सेंटी ग्रेड पर्यंत तापमान अधिक लागते. गोंदिया जिल्हा भरपूर तलावे तसेच पाऊसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. गोंदिया जिल्ह्यात धानाचे रब्बी पीक सुद्धा चांगल्या प्रमाणात घेतले जाते. जिल्ह्यात दमट हवामान साधारणपणे एप्रिल महिन्या पर्यंत असते. डॉ. भुस्कुटे यांची जवळपास २५ वर्षाची जुनी आंब्याची बाग आमगाव तालुक्यात बोरकन्हार या गावात आहे. उन्हाळा ऋतूमध्ये सुद्धा आंब्याची झाडे तेवढाच थंडावा देतात.
हेही वाचा:हिरव्या भाज्यामध्ये भेसळ आहे का नाही ओळखा सोप्या पद्धतीने
मागील दोन वर्षांपूर्वी डॉ. भुस्कुटे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातुन मिरी ची कलमे आणली होती आणि ती आंब्याच्या बुंद्याशी लावलेली होती. उन्हाळा असल्यामुळे त्यांनी चांगल्या प्रकारे पाण्याची सोय करून झाडांची काळजी घेतली.आपल्या भागात काळी मिरी चे उत्पादन निघू शकते का यासाठी त्यांनी हा प्रयोग केलेला होता. आंब्याच्या झाडांचा आधार घेत काळी मिरी वरच्या फांदी पर्यंत पोहचली आणि यावर्षी त्याला मिरी सुद्धा लागली आहेत. डॉ. भुस्कुटे यांच्या दोन वर्षांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाल्याचे दिसून येत आहे.
डॉ. श्रीराम भुस्कुटे यांनी असे सांगितले की आपल्या भागात ज्या शेतकऱ्यांनी आंब्याच्या बागा लावलेल्या आहेत त्यांनी तिथेच काळी मिरी लागवडीचा सुद्धा प्रयोग केला पाहिजे जे की यामधून शेतकरी बांधवांना चांगल्या प्रकारे उत्पादन सुद्धा प्राप्त होईल.बाजारात काळी मिरी चा भाव ४०० रुपये प्रति किलो आहे त्यामुळे शेतकरी वर्गाने याचे उत्पादन जर घेतले ते चांगला फायदा होईल. तसेच जर दारात जर आंब्याची झाडे असतील तर घरी सुद्धा काळी मिरी चा वेल लावता येईल. डॉ. भुस्कुटे यांच्या प्रयत्नामुळे तेथील शेतकरी सुद्धा हा प्रयोग करतील अशी अशा त्यांना आहे.
Published on: 29 August 2021, 11:31 IST