News

मुंबई: बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड (बीकेटी) या भारतातील आघाडीच्या ऑफ-हायवे टायर उत्पादकाने “लालिगाचा अधिकृत जागतिक भागीदार” म्हणून करार केला आहे. बीकेटीने एखाद्या खेळाप्रमाणे, कोणत्याही मर्यादांविना कामगिरी करायचे उद्दिष्ट ठेवले आहे. आणि लिगा दे फुटबॉल प्रोफेशनल (लालिगा) प्रमाणे बीकेटी जागतिक स्तरावर कार्यरत आहे. यामुळेच नव्या भागीदारीसाठी अनुकूल स्थिती निर्माण होते.

Updated on 09 October, 2019 3:03 PM IST


मुंबई:
बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड (बीकेटी) या भारतातील आघाडीच्या ऑफ-हायवे टायर उत्पादकाने “लालिगाचा अधिकृत जागतिक भागीदार” म्हणून करार केला आहे. बीकेटीने एखाद्या खेळाप्रमाणे, कोणत्याही मर्यादांविना कामगिरी करायचे उद्दिष्ट ठेवले आहे. आणि लिगा दे फुटबॉल प्रोफेशनल (लालिगा) प्रमाणे बीकेटी जागतिक स्तरावर कार्यरत आहे. यामुळेच नव्या भागीदारीसाठी अनुकूल स्थिती निर्माण होते. ही नवी भागीदारी तातडीने अमलात येणार आहे आणि 2021/2022 हंगामाच्या अखेरीपर्यंत, म्हणजे तीन वर्षे सुरू राहणार आहे.

“लालिगा हे उत्कृष्टकतेचे प्रतिक आहे आणि कॅपिटल ‘एफ’सह फूटबॉलसाठी समानार्थी आहे,” असे बीकेटीचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार यांनी सांगितले. ते म्हणाले, “आजपासून, आम्ही स्पॅनिश फूटबॉल विश्वामध्ये नव्या मार्केटिंग उपक्रमाचा अवलंब करणार आहोत, आणि याचा मला अतिशय आनंद व अभिमान आहे. लालिगा हा उत्कृष्ट मूल्य असणारा ब्रँड आहे. त्यासोबत काम करणे गौरवास्पद आहे.”

“बीकेटी आणि क्रीडा विश्व किंबहुना संपूर्ण फूटबॉल जगत यांच्यातील नाते आम्ही अधिक गहिरे करू शकतो, ही आनंदाची बाब आहे. निश्चय व जिंकण्याची ईर्षा याबरोबरच, फूटबॉल जगतातील नियम व वैशिष्ट्ये आमच्या मूल्यांसारखीच आहेत, असे आम्हाला वाटते,” असे पोद्दार यांनी नमूद केले.

ब्रँडविषयी जागृती वाढवण्यासाठी बीकेटी करत असलेल्या वाटचालीतील हे निर्णायक उद्दिष्ट आहे. कम्युनिकेशन व प्रसिद्धी यांचा विचार करता, कंपनी अत्यंत सक्रियपणे कार्यरत असून, हे कंपनीचे उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे. बीकेटीचे जागतिक स्तरावरील कार्य अधोरेखित करण्यासाठी क्रीडा हे आदर्श साधन आहे. याचे श्रेय लालिगाच्या काही ठळक वैशिष्ट्यांना जाते, जसे न्याय्य खेळ, स्पर्धा, धोरण व स्पर्धकांचा आदर.

लालिगा इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक जोस अँटोनिओ कॅकझा यांनी सांगितले, “बीकेटीने आपल्या प्रमुख भागधारकांशी संवाद साधत असताना नेहमी खेळांची क्षमता ओळखली आहे. लालिगाप्रमाणेच मूल्य असणाऱ्या बीकेटीचे पुढील तीन वर्षांसाठी भागीदार म्हणून सहर्ष स्वागत आहे. एकत्रितपणे आम्ही लालिगाला जगभरातील चाहत्यांच्या आणखी जवळ आणू शकू, तसेच आमचा ब्रँड जागतिक स्तरावर प्रगती करत राहील, याची खात्री आहे.”

बीकेटी जगभर विविध क्रीडा उपक्रमांसाठी पाठिंबा देत असताना, त्यामध्ये लालिगाचा अधिकृत जागतिक भागीदार बनण्याचा समावेश करण्यात आला आहे. या उपक्रमांमध्ये, बीकेटी टायर लावलेले भव्य माँस्टर ट्रक थरारक स्टंट करतात त्या माँस्टर जॅम सर्किट या अमेरिकन मोटरस्पोर्टबरोबरचा 2014 करार; इटालियन सेकंड लीग चॅम्पिअनशिपची प्रशासकीय संघटना असणाऱ्या लेगा नाझीओनेल प्रोफेशनिस्ती बीबरोबर प्रायोजकत्व करार, जो गेल्या वर्षी करण्यात आला व जून 2021 पर्यंत लागू राहणार आहे व त्याचे नाव “सेरी बीकेटी” असे करण्यात आले आहे.

या भागीदारीविषयी, लालिगा अम्बेसिडर डिएगो फोरलान यांनी सांगितले, “भारतात फूटबॉल अतिशय लोकप्रिय आहे आणि जागतिक फूटबॉल बनण्यासाठी प्रचंड क्षमता आहे. भारतात असताना मी भारतीय फूटबॉल खेळाडूंशी, इच्छुक खेळाडूंशी व देशात फूटबॉलसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी गुंतवणूक केलेल्या अन्य संबंधित घटकांशी संवाद साधला. अधिक जागृती करण्यासाठी बीकेटीसारखा भारतीय ब्रँड लालिगाशी सहयोग करत आहे, ही बाब कौतुकास्पद आहे.”

याबरोबरच, बीकेटीने जून 2024 पर्यंत फ्रेंच “कूप दे ला लिग बीकेटी” ही फूटबॉल स्पर्धाही प्रायोजित केली आहे, तसेच केएफसी बिग बॅश लीगसह ऑस्ट्रेलियन क्रिकेट चॅम्पिअनशिपबरोबरही भागीदारी केली आहे आणि ही भागीदारी आणखी दोन वर्षांसाठी आहे. स्थानिक स्तरावर, बीकेटीसाठी स्पेन ही मोक्याची व प्रामुख्याने शेती क्षेत्रातील महत्त्वाची बाजारपेठ आहे. विविध विशेष क्षेत्रांत वापरले जाणारे टायर बीकेटी उपलब्ध करते. तरीही, बीकेटीने सुरुवात शेती क्षेत्रापासून केली, आणि कंपनीने हे क्षेत्र खरेच गाजवले आहे. बीकेटी ब्रँड प्रामुख्याने स्पॅनिश युजर्समध्ये लोकप्रिय आहे. युजर्स व ब्रँड यांच्यातील नाते अधिक घट्ट करण्याची ही योग्य वेळ आहे. त्यासाठी खेळापेक्षा चांगला पर्याय दुसरा असू शकतो का

बीकेटीविषयी:

बाळकृष्ण इंडस्ट्रीज लि. (बीकेटी) ही भारतातील टायर उत्पादक आहे. बीकेटी समूहाने शेती, औद्योगिक, अर्थमूव्हिंग, खाणकाम, एटीव्ही व गार्डनिंग या क्षेत्रांसाठी नेहमी मोठ्या प्रमाणातील ऑफ-हायवे टायर्स उत्पादने उपलब्ध केली आहेत व नेहमी त्यात आवश्यक बदल केले आहेत. वैविध्यपूर्ण युजरच्या निरनिराळ्या गरजांसाठी तयार केलेल्या नावीन्यपूर्ण उत्पादनांमध्ये जगभरातील 160 देशांत विक्री केल्या जाणाऱ्या 2,700 उत्पादनांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी पाहा वेबसाइट www.bkt-tires.com.

लालिगाविषयी:

1984 मध्ये स्थापन झालेली, लालिगा (लिगा दे फुटबॉल प्रोफेशनल) ही क्रीडा संघटना असून त्यामध्ये 42 संघांचा समावेश आहे व हे संघ स्पेनमधील प्रोफेशनल फूटबॉलचे पहिल्या व दुसऱ्या डिव्हिजनचे संघ आहेत. लालिगा संतंदेर व लालिगा स्मार्टबँक यांची जबाबदारी माद्रिदमधील लालिगाची असून 2018/19 हंगामामध्ये संघटनेने जगभरातील 2.7 अब्जाहून अधिक लोकांपर्यंत हे खेळ पोहोचवले. संघटनेचे एक फौंडेशनही आहे आणि हे जगातील पहिले प्रोफेशनल फूटबॉल लीग आहे. त्यामध्ये बुद्धिमत्तेच्या बाबतीत आव्हान पेलणाऱ्या फूटबॉलपटूंचा समावेश आहे: लालिगा जेन्युइन संतंदेर.

English Summary: BKT Scores Global Agreement with Spanish Football League Laliga
Published on: 09 October 2019, 01:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)