News

आजपासून विधानसभेसह विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरवात झाली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विधानसभेत राष्ट्रपतींसह उपराष्ट्रपतींच्या अभिनंदन प्रस्तावावर भाषणे झाली. विधान परिषदेत मात्र याआधी कधीही न पाहायला मिळालेले ऐतिहासिक चित्र दिसून आले. मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे देखील शिवसेनेचे आहेत. तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले अंबादास दानवे हे देखील शिवसेनेचे आहेत.

Updated on 18 August, 2022 3:07 PM IST

कालपासून विधानसभेसह विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरवात झाली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विधानसभेत राष्ट्रपतींसह उपराष्ट्रपतींच्या अभिनंदन प्रस्तावावर भाषणे झाली. विधान परिषदेत मात्र याआधी कधीही न पाहायला मिळालेले ऐतिहासिक चित्र दिसून आले. मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे देखील शिवसेनेचे आहेत. तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले अंबादास दानवे हे देखील शिवसेनेचे आहेत.

यामुळे हे अधिवेशन इतर अधिवेशनापेक्षा काहीसे वेगळे आहे. सध्याच्या राजकीय पेचामुळे एकाच पक्षातील दोन नेते एकमेकांसमोर उभे असल्याचे चित्र दिसून आले. असे असताना विरोधकांनी पायऱ्यांवरच घोषणाबाजी केली आहे. ५० खोके एकदम ओके. आले रे आले गद्दार आले, अशा घोषणा यावेळी विरोधकांनी दिल्याचे पाहायला मिळाले. यामुळे याची चर्चा सुरु आहे.

शिंदेगटाच्या बंडाचं केंद्र असलेल्या गुवाहाटीचा संदर्भ देत महाविकास आघाडीच्या (MahaVikas Aghadi) नेत्यांनी घोषणा दिल्या. “गद्दारांना भाजपची ताट वाटी, चलो गुवाहाटी,चलो गुवाहाटी!”, या घोषणेने सर्वाचंच लक्ष वेधलं.एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केलं. यामुळे सरकार पडले.

मोदी सरकारची मोठी घोषणा! आता कृषी कर्जावरील व्याजात मिळणार मोठी सूट

यावेळी शिवसेना राष्ट्रवादीसह काँग्रेसचे आमदार एकसाथ थांबून घोषणा देत असल्याचे दिसून आले. शिंदे फडणवीस सरकारचे हे पहिलेच अधिवेशन असल्यामुळे या अधिवेशनात नवीन सरकार काय महत्वाचे निर्णय घेणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष आहे. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यसह इतर आमदार त्यासोबतच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह इतर आमदार घोषणा देताना दिसून आले.

Nashik: नाशिकच्या शेतकऱ्याचा इस्राईल पॅटर्न! मत्स्यपालनातून होतेय लाखोंची कमाई..

दरम्यान, काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये ७५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना एसटीमध्ये मोफत प्रवास करण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांना मदतीची देखील घोषणा करण्यात आली आहे. आता आज काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
विनायक मेटेंच्या भाच्याच्या दाव्याने खळबळ! म्हणाले, तेव्हा विनायक मेटे कारमध्ये नव्हतेच...
कोरोना वाढतोय! प्रवाशांना पुन्हा मास्क सक्ती, वाचा आता नवीन नियम..
पुणे लोकसभा मतदार संघात फडणवीसांसाठी चाचपनी, केंद्रात दिली मोठी जबाबदारी

English Summary: 'BJP's plate for traitors, let's go to Guwahati, let's go to Guwahati'
Published on: 18 August 2022, 03:07 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)