News

आज गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येत आहे. यामध्ये भाजपने मोठ्या विजयाकडे वाटचाल केली आहे. यामुळे आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये अनेक नावे चर्चेत आहेत.

Updated on 08 December, 2022 3:56 PM IST

आज गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येत आहे. यामध्ये भाजपने मोठ्या विजयाकडे वाटचाल केली आहे. यामुळे आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये अनेक नावे चर्चेत आहेत.

सध्या गुजरातमध्ये भाजप 155 जागांवर पुढे आहे. गुजरातमध्ये भाजप सरकार स्थापन करणार, हे जवळपास निश्चत झालेलं आहे. गुजरातमध्ये भाजप मुख्यमंत्रीपदाची संधी कुणाला देणार? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. यामध्ये चंद्रकांत पाटील यांचंही नाव चर्चेत आहे.

भाजपला ऐतिहासिक यश मिळवून देण्‍यात गुजरात भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. १४ वर्ष पाोलीस दलात सेवा बजावल्‍यानंतर त्‍यांनी १९८४ नाोकरीचा राजीनामा दिला.

मोठी बातमी! पुणे महापालिकेचे विभाजन, फुरसुंगी उरुळीसाठी नवी नगरपालिका

यानंतर त्‍यांनी काही काळ पत्रकारीता केली. १९९१ मध्‍ये त्‍यांनी स्‍वत:चे नवगुजरात टाइईम्‍स नावाने दैनिकही सुरु केले. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. प्रत्‍येक काम अचूकतेने केल्याने अल्‍पवधीत पक्षाने त्‍यांना सुरत शहर भाजप उपाध्‍यक्षपद सोपवले.

२००९ मध्‍ये नवसारी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली. यानंतर सलग तीनवेळ त्‍यांनी याच मतदारसंघाचे प्रतिनिधत्‍व केले. २०१९ च्‍या लोकसभा निवडणुकीत त्‍यांनी तब्‍बल ६.८९ लाख मतांच्‍या फरकाने विजय मिळवला.

आम आदमीने दिल्ली महापालिकेचे तख्त जिंकले, भाजपची 15 वर्षांची सत्ता उलथवली

ते कट्टर मोदी समर्थक म्हणून ओळखले जातात. सूरतमधील कारखानदार ते कामगारांपर्यंत त्‍यांचा दांडगा जनसंपर्क आहे. वृत्तपत्र आणि एका वृत्तवाहिनीचे ते मालक आहेत. तसेच शेतकरी असणार्‍याबरोबरच एक यशस्‍वी उद्योगपती अशीही त्‍यांची ओळख आहे.

महत्वाच्या बातम्या;
धक्कादायक! वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, शिल्लक ठेवले फक्त धड...
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्याला जो धडा शिकवेल त्याला मोफत गुवाहाटी ट्रिप!!
कांद्याचा वांदा! शेतकऱ्याने रेखाटली कांद्यावर नरेंद्र मोदींची मुद्रा, शेतकरी अडचणीत

English Summary: BJP Gujarat! Chandrakant Patil Chief Minister Gujarat?
Published on: 08 December 2022, 03:56 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)