सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांचे ऊस अजूनही तोडले गेले नाहीत, असे शेतकरी चिंतेत आहेत. असे असताना बीड जिल्ह्यात धक्कादायक घटना घडत आहेत. अतिरिक्त उसाचे गाळप न झाल्यामुळे गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील तरुण शेतकऱ्याने उसाच्या फडाला आग लावली व नंतर ( Farmer Suicide ) गळ्याला फास घेऊन आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
असे असताना उसाला कारखान्याची तोड मिळाल्याने मारफळा येथील शेतकरी आनंद साजरा करत आहेत. दोन्ही शेतकऱ्यांचा प्रश्न एकच होता पण त्यांच्याबाबत ही घटना समोर आल्याने एक वेगळेच चित्र समोर आले आहे. अनेक दिवस होऊन देखील उसाची तोड होते की नाही या धास्तीने गेवराई तालुक्यातील नामदेव जाधव या 35 वर्षीय शेतकऱ्याने दीड एकरातील उसाचा फड पेटवून गळपास घेऊन आत्महत्या केली.
असे असताना याच तालुक्यातील मारफळा इथले रविराज कुटे या शेतकऱ्याचा ऊस कारखान्याने तोडला त्याचा आनंद साजरा केला. याच आनंदाच्या भरात गावाने ट्रॅक्टर समोर ढोल-ताश्याच्या गजरात ठेका धरला होता. त्यामुळे अतिरिक्त उसाने निर्माण केलेल्या दोन घटनांची चर्चा सुरु आहे. एका शेतकऱ्याने तर आनंदाच्या भरात चक्क साडी परिधान करून गाण्याच्या तालावर थिरकायला सुरुवात केली. याचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.
तसेच गावातील अनेक शेतकऱ्यांनी नृत्यावर ठेका धरला, गुलालाची उधळण बँड बाजा आणि गाण्यावर ताल धरत शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने उसाची पाठवणी केली आहे. काहीजण ऊस तोडायला आलेल्या मजुरांना पैसे देत आहेत, तर त्यांना जेवण मटण दारू देखील पुरवली जात आहे. यामुळे हा प्रश्न किती गंभीर झाला असल्याचे आपल्याला दिसून येईल.
सध्या मे महिना असतानाही हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. यामुळे अनेकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. यामुळे अनेक शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असल्याचे दिसून येत आहे. ऊन वाढल्याने वजनात देखील मोठ्या प्रमाणावर घट होणार आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
महत्वाच्या बातम्या;
गोड बातमी : बंद पडलेल्या 11 साखर कारखान्यांना आता मिळणार नवसंजीवनी
राकेश टिकैत यांचे भारतीय किसान युनियनमधून हकालपट्टीचे खरे कारण आले समोर..
किसान क्रेडिट कार्डवरील व्याज सरकार माफ करणार? व्हायरल मेसेजमुळे शेतकऱ्यांची पळापळ
Published on: 16 May 2022, 11:07 IST