मागे काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात पोल्ट्री व्यवसाय अतोनात नुकसान करणारा बर्ड फ्लू पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सीमेवर येऊन पोहोचला आहे.याबाबतची माहिती अशी की,केरळ राज्यातीलअलाप्पुझाया जिल्ह्यातील थाकाझीया तालुक्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रसार झाल्याचे समोर आले आहे.
केरळ मधील पूरक्कडयेथून पाठवण्यात आलेल्या बदकांमध्ये बर्ड फ्लूचे विषाणू आढळून आल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती अधिकाऱ्यांना मिळताच प्रभावी भागातील एक किलोमीटरपर्यंतच्या भागातील बदके, कोंबड्यांना मारण्याचे आदेश दिले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी पशूपालन, आरोग्य आणि पोलीस विभागातील अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली. या रोगाचा संसर्ग पसरू नये यासाठी प्रशासनाने थाकाझी ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 10 जवळील एक किलोमीटर परिसरातील बदके, कोंबडी आणि घरेलू पक्षांना मारण्याचा आदेश दिला आहे.
तसेच प्रभावीत भागातील कोंबड्या आणि पक्ष्यांची अंडी तसेच मांस आदीच्या विक्रीवर बंधने घातली आहेत. प्रशासनाने चंपा कुलम, वियापुरम, करुवट्टा, थकाझी, पूरक्कड अंबालापुझा दक्षिण येथे नगरपालिका भागात प्रतिबंध लावले आहेत.
तसेच मध्य प्रदेश राज्यातील आगर मालवा जिल्ह्यात 48 कावळे मृतावस्थेत आढळले होते.
त्यांनाही बर्ड फ्लूची लागण झाल्याची पुष्टी झाली होती. तसेच राजस्थान मधील नागोर जिल्ह्यातही बर्ड फ्लूची प्रकरणे समोर आली आहेत. तिथे देखील पाच दिवसात 60 पेक्षा जास्त कावळ्याचा मृत्यू झाला होता.
( संदर्भ- कृषी रंग )
Published on: 10 December 2021, 05:44 IST