News

सटाणा तालुक्याच्या पश्चिम आदिवाशी भागात गेल्या दोन- तीन दिवसांत दोनशेहून अधिक देशी कोंबड्या मृत झाल्या आहेत. या संशियत कोंबड्याचे नमुने पशुसंवर्धन विभागाने भोपाळ प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. याविषयीचे वृत्त अॅग्रोवन दिले आहे. या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

Updated on 24 February, 2021 4:03 PM IST

सटाणा तालुक्याच्या पश्चिम आदिवाशी भागात गेल्या दोन- तीन  दिवसांत दोनशेहून अधिक देशी कोंबड्या मृत झाल्या आहेत. या संशियत कोंबड्याचे नमुने पशुसंवर्धन विभागाने भोपाळ प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. याविषयीचे वृत्त अॅग्रोवन दिले आहे. या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

याबाबत तत्काळ आदेश काढत या भागातील एक किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र तर दहा किलोमीटरचा परिसर निगराणी क्षेत्र म्हणून जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी घोषित केला. सटाणा तालुक्यातील वाठोडा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील वग्रीपाडा येथे आदिवासी शेतकरी सुरेश महाले यांनी ३०० देशी कोंबड्या आणून कुक्कुटपालनासाठी घरगुती पक्षीगृहात ठेवल्या होत्या. कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाल्यावर स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली होती. कोंबड्या मृत झाल्यानंतर स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने गावकऱ्यांना सूचना दिल्या.  बाधित क्षेत्रातील सर्व कुक्टपक्ष्यांची, खाद्य व अंड्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत शीघ्र कृती दलास जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले. येथील परिसर , कुक्कट पक्षी गृह निर्जंतुकीकरण करुन किमी त्रिज्येतील परिसरात कुक्कूटपक्ष्यांची खरेदी विक्री, वाहतूक, बाजार, व जत्रा प्रदर्शन आयोजित करण्यास पुढिील ९० दिवस होईपर्यंत प्रतिबंध करण्यात आला.

 बर्ड फ्लू आहे तरी काय?

बर्ड फ्लू हा पक्षांमध्ये पसरणारा एक संसर्गजन्य रोग आहे. ज्याला बर्ड फ्लू वा एवियन एन्फ्लुयेन्झा (avian influenza) असंही म्हणतात. जो पक्षांच्या लाळेवाटे, विष्ठेवाटे किंवा त्यांच्या डोळ्यांवाटे इतर पक्ष्यांमध्ये पसरतो. पक्ष्यांनी पंख जरी झटकले, तरी हा विषाणू इतरत्र पसरु शकतो. ज्या पक्षांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते, ते पक्षी यामुळे दगावतात. पक्षांद्वारेच हा रोग माणसांपर्यंत पोहचतो. जे लोक पोल्ट्री व्यवसाय करतात, वा कोंबड्या वा इतर पक्षांची ज्यांचा जवळचा संबंध आहे, त्यांच्यामध्ये हा रोग पसरण्याची शक्यता जास्त असते.

 

बर्ड फ्लूच्या नावातील ‘H’,’N’चा अर्थ काय?

पक्षांमध्ये पसरणाऱ्या फ्लूचे म्हणजेच बर्ड फ्लूचे अनेक उपप्रकार आहेत. त्यातील H म्हणजे हेमाग्युलेटीन (Hemagglutinin) आणि N म्हणजे न्यूरामिनीडिज (Neuraminidase) हे दोन्ही या विषाणूचे प्रोटीन स्ट्रेन आहेत. आणि याच्याच उपप्रकारांना नंबर दिलेले आहेत. H म्हणजेच हेमाग्युलेटीनचे 18 उपप्रकार आहेत, तर N म्हणजेच न्यूरामिनीडिजचे 11 उपप्रकार आहेत. यातील फक्त H5, H7 आणि H10 याच स्ट्रेन माणसाच्या मृत्यू कारण ठरु शकतात. त्यामुळं H5N1 हा माणसांसाठी अधिक धोकादायक मानला जातो.यामधील H17N10 आणि H18N11 हे फक्त वटवाघुळांमध्येच आढळतात. बाकी पक्षांमध्ये याचा प्रसार होत नाही.

बर्ड फ्लूची लक्षणं काय?

बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर ताप येणं, घशात खवखव होणं, वा जास्त इन्फेक्शन होणं, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणं, पित्त वा कफचा त्रास आणि रोग जास्त पसरला असल्यास निमोनिया होण्याची शक्यता जास्त असते. ही सगळी लक्षणं सध्याच्या कोरोना विषाणूंच्या लक्षणांशी मिळती-जुळती आहेत, त्यामुळं सध्याच्या काळात हा विषाणू धोकादायक ठरु शकतो

 

English Summary: Bird flu has hit native chickens in Satana taluka
Published on: 01 February 2021, 11:42 IST