पोल्ट्री उद्योगावर परत एकदा संकट आले आहे. राज्यातील अनेक भागात पोल्ट्री व्यवसाय शेतीला पुरक व्यवसाय म्हणून केला जातो. अनेक शेतकरी यात मोठी गुंतवणूक करुन आपली कमाई वाढविण्याचा प्रयत्न करतात.
परंतु देशात आलेल्या बर्ड फ्लूने शिरकाव केल्याने पोल्ट्री उद्योगावर मोठं संकट आले आहे. अहमदनगर, नाशिक, पुणे, सोलापूर, सांगली, आणि मराठवाड्यातील अनेक भागात शेतीला पुरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री उद्योग केला जातो. कोरोनाकाळात सुरुवातीला अफवांमुळे पोल्ट्री उद्योगाला फटका बसला होता. दरम्यान आता बर्ड फ्लू पार्श्वभूमीवर चिकनची मागणी घटल्याने जिवंत कोंबडीच्या दरात २५ ते ३० रुपयांनी तर किरकोळी विक्रीच्या दरात ४०ते ५० रुपयांनी घट झाली आहे. अंड्याचे दरही नगामागे पन्नास पैसे ते एक रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील दररोज ७० कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचा अंदाज पोल्ट्री उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. बर्ड फ्लूच्या कारणामुळे राज्यात चिकनची मागणी घटली आहे.
हेही वाचा : हिवाळ्यात शेडमधील कोंबड्यांची कशी घ्याल काळजी; वाचा संपुर्ण माहिती
महिनाभरात सुमारे दोन हजार कोटींचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या संकटातून सावरत असतानाच पुन्हा एकदा बर्ड फ्लूचे संकट आले. परभणी पठोपाठ नगर, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, लातूर भागातील काही ठिकाणी कोंबड्या व विविध पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. काही भागात मृत्यूचे कारण अजून स्पष्ट केले नसले तरी यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान चिकनची मागणी घटली असून चार दिवसांपासून जिवंत कोंबडीच्या दरात २५ ते ३० रुपये, तर किरकोळ विक्रीत ४० ते ५० रुपयांनी दर खाली आले आहेत.
प्रति अंड्यामागे ५० पैसे ते एक रुपयाने घट झाली आहे.मागणी घटली आणि दरही कमी झाल्याने राज्यात दररोज सुमारे ७० कोटींचा फटका बसत आहे. केवळ अफवा आणि अपप्रचारामुळे हा फटका बसून तो थांबवा, असे आववाहन करतानाच १५ दिवसांनंतर परिस्थिती सुधरेल असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.
Published on: 14 January 2021, 07:33 IST