1. बातम्या

खत खरेदी करण्यासाठी अंगठा लावण्याची सक्ती, म्हणुन कोरोना होण्याची शेतकऱ्यांना भिती

कोरोना नामक महाभयंकर आजाराने दस्तक दिल्यापासून शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हजेरी लावण्यासाठी बायोमेट्रिक सिस्टीम बंद करण्यात आली. शाळा-महाविद्यालयात तसेच इतर शासकीय कार्यालयात हजेरी लावण्यासाठी बायोमेट्रिक मशीन चा वापर करण्यात येतो मात्र कोरोना मुळे शासनाने बायोमेट्रिक मशीन वर हजेरी लावण्यास मनाई केली आहे. मात्र असे असले तरी शेतकरी राजांना खत खरेदी करण्यासाठी बायोमेट्रिक मशीन वर अंगठा लावण्याची सक्ती केली जात आहे? त्यामुळे शेतकरी राज्यांच्या मनात कोरोना होण्याची धास्ती घर करू लागली आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
biometric is mandatory for fertilizer

biometric is mandatory for fertilizer

कोरोना नामक महाभयंकर आजाराने दस्तक दिल्यापासून शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हजेरी लावण्यासाठी बायोमेट्रिक सिस्टीम बंद करण्यात आली. शाळा-महाविद्यालयात तसेच इतर शासकीय कार्यालयात हजेरी लावण्यासाठी बायोमेट्रिक मशीन चा वापर करण्यात येतो मात्र कोरोना मुळे शासनाने बायोमेट्रिक मशीन वर हजेरी लावण्यास मनाई केली आहे. मात्र असे असले तरी शेतकरी राजांना खत खरेदी करण्यासाठी बायोमेट्रिक मशीन वर अंगठा लावण्याची सक्ती केली जात आहे? त्यामुळे शेतकरी राज्यांच्या मनात कोरोना होण्याची धास्ती घर करू लागली आहे.

शिवाय शासनाच्या या नियमा विरुद्ध शेतकऱ्यांच्या मनात रोष देखील वाढत आहे. शेतकऱ्यांच्या मते एकाच बायोमेट्रिक मशीन वर अनेक अधिकारी हजेरी लावत असतात त्यामुळे कोरोना होण्याची भीती असते आणि म्हणूनच शासनाने बायोमेट्रिक हजेरी बंद केली. मात्र कृषी सेवा केंद्रावरती हजारो शेतकरी दररोज खते खरेदी करण्यासाठी येतात आणि शेतकऱ्यांना खाते खरेदी करण्यासाठी बायोमेट्रिक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मग यामुळे शेतकरी राजांना कोरोना होण्याची भीती नाही का? असा खोचक सवाल आता बळीराजा उपस्थित करताना दिसत आहे. राज्यात कोरोना तसेच त्याचा नवा व्हेरीयंट ओमिक्रोन हळूहळू पाय पसरू लागला आहे. त्याअनुषंगाने शासन दरबारी अनेक उपाय योजना देखील राबविल्या जात आहेत. मात्र या उपाय योजना राबविताना शासन दुजाभाव करताना दिसत आहे. हे बायोमेट्रिक शेतकऱ्यांसाठी सक्तीचे करणे आणि अधिकार्‍यांसाठी यात सवलत देणे यावरून दिसत आहे. शासन आपल्या सोयीने व आपल्या सुरक्षेसाठी उपाययोजना आखत असते, असे देखील शेतकऱ्यांनी मत व्यक्त केले आहे.

जेव्हा देशात कोरोनाव्हायरसची पहिली आणि दुसरी लाट आली होती, तेव्हा देशात लॉकडाऊन लावण्यात आले. तदनंतर देशात कोरोना व्हायरसचा शिरकाव कमी झाल्यानंतर लॉकडाऊन मध्ये सवलत देण्यात आली. आणि शासकीय कार्यालय 50% मर्यादेवर सुरू करण्यात आली, मात्र त्यावेळी  शासकीय कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी लावण्यास मनाई करण्यात आली होती. कारण की बायोमेट्रिक वर हजेरी लावताना गर्दी होण्याची शक्यता होती तसेच कर्मचारी एकाच मशीनवर हजेरी लावत असल्याने करुणा संसर्गाचा धोका कायम होता. जेव्हा दुसरी लाट पुर्णता ओसरली गेली तेव्हा शासकीय कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी लावण्याची परवानगी देण्यात आली. मात्र आता पुन्हा एकदा देशात कोरोनाव्हायरस आपले पाय पसरवीत आहे, आणि त्या अनुषंगाने शासनाने पुनश्च एकदा शासकीय कर्मचाऱ्यांना  हजेरी लावण्यासाठी बायोमेट्रिक मशीनचा उपयोग न करण्याचा आदेश दिला आहे. 

मात्र, शेतकरी राजांना खताची एक गोणी घेण्यासाठी देखील आधार कार्ड दाखवून बायोमेट्रिक मशीन वर अंगठा ठेवावा लागत आहे, आणि त्यामुळे कोरोना कोणाचा धोका वाढला आहे. एकीकडे शासन शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षेची पूर्ण खातरजमा करत आहे तर दुसरीकडे शेतकरी राजांसाठी यासंदर्भात कुठलीही उपाययोजना करण्यात येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाच्या या दुजाभावामुळे शेतकऱ्यांच्या मनात रोष वाढतच आहे. शासन शेतकऱ्यांना देखील खत खरेदी करण्यासाठी बायोमेट्रिक ची सक्ती ठेवणार नाही अशी आशा शेतकऱ्यांना आहे, आता शासन यावर काय उपाययोजना आखते हे बघण्यासारखे असेल.

English Summary: biometric is mandatory for fertilizer buying Published on: 19 January 2022, 09:12 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters