News

या घोटाळ्यात एका नायब तहसीलदारासह तब्बल 29 जणांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Updated on 26 May, 2022 12:09 PM IST

Kushivali Dam Scam: अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली धरणाच्या भू संपादनात झालेला मोठा घोटाळा आता समोर आला आहे. या घोटाळ्यात एका नायब तहसीलदारासह तब्बल 29 जणांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या घोटाळ्याच्या व्याप्तीत अजून वाढ होणार असून यात अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा हात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली गावात धरण बांधले जाणार आहे. हे धरण बांधण्यासाठी शेतकऱ्यांच्या जागा संपादित करून त्या जागेचा योग्य मोबदला त्यांना देण्यात येत आहे. मात्र मोबदला देण्याच्या या प्रकरणात मोठा घोटाळा करण्यात आला आहे. ज्या व्यक्तीची जागा आहे त्या व्यक्तीला मोबदला मिळण्याऐवजी
त्याचा लाभ दुसऱ्यानेच घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे.

मूळ शेतकऱ्याच्या जागी अन्य बोगस व्यक्तीला उभे करून नकली कागदपत्रे तयार करून कोट्यावधींचा मोबदला परस्पर मिळवला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात 25 शेतकऱ्यांचे तब्बल 11 कोटींपेक्षा जास्त रक्कमेचा घोटाळा झाला आहे. ऑक्टोबर 2021 साली, उल्हासनगर उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांनी या भू संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला त्या लाभार्थी शेतकऱ्यांची कागदपतत्रे तपासली तेव्हा त्यांना संशय आला.

महत्वाची योजना: 'या' योजनेच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीसाठी मिळते आर्थिक मदत, वाचा आणि घ्या माहिती

सुरुवातीला त्यांना ही कागदपत्रे खोटी असल्याचं जाणवलं. याबाबत त्यांनी अधिक तपासणी केली असता धनादेश घेण्यासाठी आलेले शेतकरी हे बोगस असल्याचं समोर आलं. त्यानंतर उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अजूनही या प्रकरणात आणखीन काही प्रकरण समोर येण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊनमध्ये सुरुवात -
नकली कागदपत्रे तयार करून मृत आणि जिवंत असणाऱ्या प्रकल्पग्रस्थांची जवळजवळ लाखो रुपयांची रक्कम लाटण्याचा प्रकार समोर आला आहे.
सध्या शेतकऱ्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. गुन्हेगारांना तातडीने शिक्षा करावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.
या सगळ्या प्रकरणाला कोरोना काळात सुरुवात झाली. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पैशाचा दुसऱ्याच व्यक्तीने लाभ घेतल्याने शेतकऱ्यांना मोठा धक्काच बसला आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाला संघर्ष समिती कुशीवली यांचा विरोध होता.

अखेर शेतकऱ्यांसमोर उघडकीस आले प्रकरण -
राजकीय तसेच सामाजिक संघटनांकडून महापालिका क्षेत्रांसाठी कुशीवली धरणाची मागणी केली जात असता, शेतकरी धरणाला विरोध करण्यासाठी गेले तेव्हा उप विभागीय कार्यालयात शेतकऱ्यांनी पैसे घेतले आहे अशी माहिती काहींनी शेतकऱ्यांना दिली. या नंतर शेतकरी खडबडून जागे झाले. सर्वानी तातडीने एकत्र येऊन या प्रकरणाची माहिती घेतली तेव्हा जिवंत आणि मृत व्यक्तींचे बनावट कागदपत्र तयार करून पैसे लाटले असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. या प्रकरणामुळे शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

प्रकरणात राष्ट्रवादी व शिवसेनेचा नेता सामील -
शिवसेनेचा एक तर दुसरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उप सरपंचाचा भाऊ आहे.भाजपचे स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी तत्कालीन उप विभागीय अधिकारी गिरासे यांना अटक करा अन्यथा आठ दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपोषणाला बसू अशी घोषणा केली आहे.

मोठमोठ्या अधिकाऱ्यांचा समावेश -
या प्रकरणात तत्कालीन तलाठ्यासह उप विभागीय अधिकारी यांच्या अडचणीमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मृत आजोबांचे नकली आधारकार्ड -
माझे आजोबा रामा बांगर हे मृत होऊन १९ वर्षे लोटली आहेत, त्यावेळी तर आधार कार्डदेखील नव्हते. तरी आजोबांच्या नावे आधार कार्ड बनवण्यात आले आहे मग आजोबांचे आधार कार्ड तयार कसे? असा सवाल शेतकरी शिवाजी मुसळे यांनी उपस्थित केला.

आता उल्हासनगर मध्यवर्ती पोलिस ठाण्यात या घोटाळ्याप्रकरणी एकूण चार गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये तीस जणांना अटक करण्यात आली असून एका निवृत्त नायब तहसीलदार मोहन किस्मत राव याचा महत्त्वपूर्ण सहभाग असल्याचा पोलीस तपासात उघडीस आलं आहे. यासोबतच अजूनही काही मोठे अधिकारी यात सामील असल्याची शक्यता नाकारता येत नाही. अंबरनाथ तालुक्‍यात धरण व्हायच्या आधीच एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे तालुक्यात याची मोठी चर्चा रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या:
आता महाराष्ट्रातील योजना कर्नाटकमध्ये राबवणार;कर्नाटकच्या कृषी मंत्र्यांनी केले महाराष्ट्राचे तोंडभरून कौतुक
जुन्नरच्या हापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! GI मानांकनाबाबत शरद पवारांकडून आश्वासन

English Summary: Billions scam exchanger dam! Bogus individuals place farmers; Tehsildar arrested (1)
Published on: 26 May 2022, 12:09 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)