Sanjay Raut : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मिळाला आहे. तब्बल शंभर दिवसानंतर त्यांची तुरुंगातून सुटका होणार आहे.
आज सुनावणी झाली असून अखेर 100 दिवसांनंतर संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. दरम्यान आज संध्याकाळपर्यंत ते बाहेर येण्याची शक्यता आहे. तर संजय राऊत यांच्या जामिनावर ईडी हायकोर्टात जाणार आहे.
तर संजय राऊत यांच्या जामिनावर ईडीने स्थगिती देण्याची मागणी केली आहे. विशेष पीएमपीएल कोर्टाकडून खासदार संजय राऊत यांना जमीन मंजूर केला आहे. दरम्यान त्यांना संजय राऊत यांच्या जामीनाबाबत ईडी हायकोर्टात जाणार असल्याची माहितीही समोर आली आहे.
राऊत यांना पत्रावाला चाळ प्रकरणी 31 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुंगातच होते. त्यांच्या कुटुंबीयांशिवाय त्यांना कुणालाही भेटू दिले जात नव्हते. मध्यंतरीच्या काळात राऊत यांच्या वतीने जामिनासाठी कोर्टात वारंवार अर्जही करण्यात आले.
पण त्यांना जामीन मंजूर झाला नव्हता. मात्र, आज अखेर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे शिवसेनेतून आनंद व्यक्त केला जात आहे. तब्बल शंभर दिवसानंतर त्यांची तुरुंगातून सुटका होणार आहे.
Published on: 09 November 2022, 01:45 IST