गेल्या तीन महिन्यापासून अटकेत असलेले शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जमीन मिळाला आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत सुनावणी सुरू होती. राऊत हे सातत्याने भाजपवर टीका करत होते.
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं राऊतांच्या जामीन अर्जावरी आपला निर्णय राखून ठेवला होता. आजच्या सुनावणीकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. आता संजय राऊत यांना आता जामीन मंजूर झाला आहे.
यामुळे आता ते पूर्वीसारखेच आक्रमक भूमिका घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात सत्तांतर झाले तेव्हा अनेकांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. ईडीकडून देखील दबाव टाकला जात असल्याचे सांगितले जात होते.
अखेर 100 दिवसानंतर संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे. संध्याकाळपर्यंत ते तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ते गेल्या 100 दिवसांपासून अटकेत आहेत.
कोर्टामध्ये मोठ्या संख्येनं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. प्रचंड गर्दी तरी टाचणी पडली तरी आवाज येईल, इतकी शांतता होती. सर्वाचंं लक्ष हे न्यायाधीश एम जी देशपांडे यांच्या निकालाकडे लागलं होतं. त्यांनी भाजप विरोधात आक्रमकपणे आपले म्हणणे मांडले होते.
तब्बल दीड तासांच्या प्रतिक्षेनंतर न्यायाधीश देशपांडे यांनी संजय राऊत यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. संजय राऊत यांना जामीन मिळाल्यामुळे ईडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. ईडी या प्रकरणी मुंबई हायकोर्टामध्ये जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांना दिलासा!लम्पीमुमृत्युमुखी पडलेल्या 3973 पशूंची नुकसान भरपाई खात्यावर जमा
सोयाबीन, ऊस, हरभरा या पिकातील सुरवातीपासून तणांची चिंता संपली
Published on: 09 November 2022, 01:37 IST