News

पुन्हा एकदा पहाटेचा शपथविधी चर्चेत आला आहे. यावेळी पक्षांमधील नेते न बोलता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. त्यांनी मोठं वक्तव्य करत पहाटेच्या शपथविधीमागचा गौप्यस्फोट केला आहे. तो शपथविधी शरद पवारांसोबत चर्चा करूनच झाला होता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. टीव्ही-9 ला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हा खळबळजनक दावा केला आहे.

Updated on 13 February, 2023 7:54 PM IST

पुन्हा एकदा पहाटेचा शपथविधी चर्चेत आला आहे. यावेळी पक्षांमधील नेते न बोलता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. त्यांनी मोठं वक्तव्य करत पहाटेच्या शपथविधीमागचा गौप्यस्फोट केला आहे. तो शपथविधी शरद पवारांसोबत चर्चा करूनच झाला होता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. टीव्ही-9 ला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हा खळबळजनक दावा केला आहे.

23 नोव्हेंबर 2019 च्या सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठं वळण मिळालं. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, पण हे सरकार 72 तासांमध्येच कोसळलं आणि राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं महाविकासआघाडी सरकार आलं. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट वक्तव्य केलं नसली तरी फडणवीस यावर स्पष्ट बोलले आहेत.

'आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली, की आम्हाला स्टेबल गव्हर्नमेंट हवंय, म्हणून आपण सरकार तयार करूया. राजकारणात जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला धोका देतो, तेव्हा चेहरा पाहत बसता येत नाही. मग आम्हीही निर्णय केला. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली.

जी चर्चा झाली होती ती शरद पवार साहेबांशीच झाली होती. ती काही खाली झालेली चर्चा नाही. शरद पवारांशी चर्चा झाली त्यानंतर गोष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे, त्यामुळे त्याठिकाणीही आमच्यासोबत विश्वासघातच झाला.

पहिला विश्वासघात हा मी जास्त मोठा मानतो, कारण तो आपल्यासोबतच्या व्यक्तीने केला होता. हा छोटा होता,' असं फडणवीस म्हणाले. तसेच, 'अजितदादांनी आमच्यासोबत घेतलेली शपथ फसवणुकीच्या नाही तर प्रामाणिक भावनेतून घेतली होती. पण नंतर ते कसे तोंडघाशी पडले हे अजितदादा सांगतील, त्यांनी नाही सांगितलं तर मी सांगीन,' असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं.

English Summary: Biggest news in state politics Devendra Fadnavis
Published on: 13 February 2023, 07:35 IST