News

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदापासून निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शरद पवार म्हणाले, मला विद्यार्थी चळवळीत आधिक रस होता. नववीत असताना पहिला मोर्चा काढला.

Updated on 02 May, 2023 1:15 PM IST

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदापासून निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शरद पवार म्हणाले, मला विद्यार्थी चळवळीत आधिक रस होता. नववीत असताना पहिला मोर्चा काढला.

१९६७ पर्यंत मला आमदार म्हणून संधी मिळाली. त्यानंतर सतत मी विविध पदांवर आहे. म्हणजेच गेली ५६ वर्षे मी राजकारणात विविध पदावर आहे. आता आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदारुन निवृत्ती घेत असल्याचे पवार यांनी सांगितले.

यामुळे आता नवीन अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते म्हणाले, मी काँग्रेस पक्षाचा सदस्य झाला. हळहळू मी पुण्यात काम केले. त्यानंतर मला मुंबईत काम करायचे सांगितले.

मग महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांशी संपर्क येत होते. त्यावेळी अनेक मोठे नेते हॉटेलमध्ये उतरत नव्हते तर पक्षाच्या कार्यालयात किंवा कार्यकर्त्यांच्या घरी उतरत होते. त्यावेळी इंदिरा गांधी यांच्यांशी संपर्क आला.

दरम्यान, कुठं थांबायचं हे मला कळत, असे म्हणत त्यांनी निवृत्ती जाहीर केले केली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ केला. आम्हाला तुम्हीच अध्यक्ष हवे आहेत. असे म्हणत त्यांनी एकच घोषणाबाजी केली आहे.

English Summary: Biggest news in politics! Sharad Pawar retires from the post of NCP president..
Published on: 02 May 2023, 01:15 IST