इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर आज मोठा गोंधळ बघायला मिळाला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर आल्याने धक्काबुक्की झाली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत माहिती अशी की, छत्रपती कारखान्याच्या मतदार यादीवरून आज कार्यालय बंद ठेवण्याचा इशारा पृथ्वीराज जाचक यांनी दिला होता. यासाठी आज सकाळी विरोधक याठिकाणी आले होते. यावेळी शेतकरी कृती समिती आणि सत्ताधारी संचालक मंडळामध्ये आज अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला.
यावेळी संचालक मंडळ आणि त्यांचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. यामुळे कारखान्यावरच सत्ताधारी संचालक मंडळ आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार घडला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केली.
पुण्यात टोमॅटो दराने रचला इतिहास, क्रेटला २५०० रूपये भाव...
यामुळे येथील वातावरण तणावपूर्ण बनले होते. मात्र येथे पहिल्यांदाच अशा प्रकारचे तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. येथील मतदार याद्या निवडणूक प्राधिकरण प्राधिकरणाकडे दाखल करण्यात आलेल्या आहेत.
असे असताना मात्र याद्या दाखल करताना क्रियाशील आणि अक्रियाशील मतदारांबाबत शासनाने नुकताच घेतलेला निर्णय ग्राह्य धरून त्यानुसार मतदार यादी दाखल झाल्या पाहिजेत, असा आग्रह छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांचा होता.
पावसाळ्यात राज्यातील धरणं कोरडीच, जल आयोगाचा रिपोर्ट प्रसिद्ध, जाणून घ्या...
असे असताना याकडे लक्ष दिले गेले नाही. जाचक यांनी कार्यकारी संचालकांना बाहेर घेऊन त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर हमरातुमरी सुरू झाली आणि त्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी संचालकांमध्ये एकमेकांच्या अंगावर धावून गेले.
कारखान्याला ऊस घालणाऱ्या सभासदांचे हित बघायचे असेल, तर अक्रियाशील सभासदांचा मुद्दा निकाली लावणे गरजेचे आहे. मात्र त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि यांना अशाच बिगर ऊस उत्पादक सभासदांना बरोबर घेऊन निवडणुका जिंकायच्या आहेत, असे यावेळी जाचक यांनी म्हटले आहे.
आज या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता, पुण्यात जोरदार पावसाची शक्यता..
Published on: 07 July 2023, 01:00 IST