जर आपण कोणता नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर डेअरी प्रोडक्ट्सचा व्यवसायविषयी निश्चित विचार करावा. कारण काही वर्षांपासून देशात डेअरी प्रोडक्ट्सची मागणी वाढत असून यातून आपल्याला मोठा नफा मिळू शकतो. पण त्यासाठी व्यवसाय सुरु करताना योग्य नियोजनाची गरज असते. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी ५ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते. या गुंतवणुकीतून आपण महिन्याला ७० हजार रुपयांची कमाई करु शकतात.
हा व्यवसाय सुरु करताना आपल्याला सरकारी योजनेचाही लाभ घेता येणार आहे. सरकारच्या योजनेतून आपण या व्यवसायासाठी भांडवल उभारू शकता. हो, मोदी सरकारची बहुचर्चित योजना प्रधानमंत्री मुद्रा लोन या योजनेतून आपला पैसा उभारु शकता. सरकार आपल्या फक्त पैशांची नाहीतर प्रोजेक्टविषयी पुर्ण माहितीस सुद्धा पुरवणार आहे.
प्रोजेक्ट सुरु करण्यास किती येईल खर्च
डेअरी प्रोडक्टसचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कॉस्टिंग जाणून घेणे आवश्यक आहे. आप यात फ्लेवर मिल्क, दही, बटर, दूदष आणि तुप बनवून त्याची विक्री करु शकता. प्रधानमंत्री मुद्रा स्कीमनुसार तयार करण्यात आलेल्या प्रोजेक्ट प्रोफाईलनुसार साधरण १६ लाख ५० हजार रुपयांमध्ये हा प्रोजेक्ट तयार केला जाऊ शकतो. आता आपल्याला फक्त ५ लाख रुपयांची जुळाजुळव करावी लागेल.
कारम ७० टक्के पैसा हा मुद्रा योजनेतून बँक आपल्याला देईल. आपल्याला टर्म लोन नुसार ७.५ लाख रुपये आणि वर्किंग कॅपिटल लोननुसार, ४ लाख रुपये मिळतील.
कच्चा मालावर होणारा खर्च -
प्रोजेक्ट नुसार, तुम्हाला महिन्यात १२ हजार ५०० लिटर कच्चे दूध लागेल. तर १००० किलोग्रॅम साखर खरेदी करावी लागेल. याचप्रमाणे तुम्हाला २०० किलोग्रॅम फ्लेवर आणि ६२५ किलोग्रॅम स्पाईस आणि मीठाची सोय करावी लागेल. या सर्व गोष्टींना महिन्यात साधरण ४ लाख रुपये इतका खर्च येईल.
किती होईल उत्पादन -
प्रोजेक्ट नुसार जर आपण व्यवसाय करत असाल तर एका वर्षात ७५ हजार लीटर फ्लेवर मिल्कची विक्री करु शकाल. तर ३६ हजार लिटर दही, ताक ९० हजार लिटर, आणि ४५०० किलोग्रॅम तूप बनवून त्याची विक्री करु शकता. यातून तुम्ही ८२ लाख ५० हजार रुपयांचा टर्नओवर करु शकता.
किती होईल नफा -
जर एका वर्षात ८२ लाख ५० हजार रुपयांची विक्री करतात तर आपल्याला एका वर्षात खर्च साधरण ७४ लाख ४० हजार रुपये होईल. कॉस्टसह यात १४ टक्के व्याजचाही समावेश आहे. याप्रमाणे एका वर्षात साधरण ८ लाख १० रुपयांचा निव्वळ नफा राहू शकतो.
प्रोजेक्टसाठी किती जागा लागेल - साधरण १००० वर्ग फुट जागेची गरज असेल. यात साधऱण ५०० चौरस जागा ही प्रोसेसिंगला लागेल.
अंदाजे १५० चौरस फुटांमध्ये रेफ्रिगेरेशन रुम आणि १५० चौरस फूट वॉशिंग एरिया, ऑफिसची जागा १०० चौरस फुट जागा लागेल.
कोणते यंत्र हवेत -
क्रीम स्परेटर, पॅकिंग मशीन, ऑटोक्लेव, बॉटल कॅपिंग मशीन, रेफ्रिजरेटर, फ्रीजर, केन कूलर, कॉपर बॉटम हीटिंग वेसल्स, स्टेनलेस स्टील स्टोरिंग वेसल्स, प्लास्टिक ट्रे, डिस्पेंसर, फिलर, साल्ट कंवेयर्स और सीलर्स आदि मशीनांची गरज रहील.
Published on: 17 July 2020, 02:42 IST