राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांनी अचानकपणे अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्याने कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या अध्यक्षांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अध्यक्षपदाच्या शर्यतीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे आघाडीवर आहेत.
शरद पवारांनी पद सोडल्यानंतर नव्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत तीन चार नावं प्रामुख्यानं घेतली जात आहेत. यामध्ये सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांचा समावेश आहे. पण यामध्ये सुप्रिया सुळे यांचं पारडं जड मानलं जात आहे. कारण त्यांचा देशपातळीवरील इतर पक्षांच्या नेत्यांशी संपर्क तसेच संवादही चांगला आहे.
सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडण्याबाबत शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं सूत्रांकडूनही कळतं आहे. त्यामुळं आता आजच याबाबतचा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो. सध्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठकही सुरु आहे.
महत्त्वाची बातमी! पीएम किसानवर केंद्रीय कृषिमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
मंगळवारी मुंबईत शरद पवार यांच्या लोक माझे सांगती या पुस्ककाच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. माझ्या खासदारकीचे तीन वर्ष राहिली आहेत, आता आणखी नवी जबाबदारी नको म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नव्या अध्यक्षांची निवड ही पक्षाच्या ज्येष्ठांच्या सल्ल्यानं व्हावी असंही पवार म्हणाले होते.
पालकमंत्री बेपत्ता! शोधून काढणाऱ्या व्यक्तीला मिळणार 'इतक्या' रुपयांचं बक्षीस
Published on: 03 May 2023, 11:59 IST