News

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या २८ जून २०२३ रोजीच्या आदेशान्वये ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया ९ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू करण्यात येणार असल्याचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव वसंत पाटील यांनी दिली आहे. यामुळे आता याबाबत तयारी केली जात आहे.

Updated on 04 October, 2023 9:54 AM IST

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या २८ जून २०२३ रोजीच्या आदेशान्वये ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया ९ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू करण्यात येणार असल्याचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव वसंत पाटील यांनी दिली आहे. यामुळे आता याबाबत तयारी केली जात आहे.

निवडणूकांकरीता प्रारूप अंतिम मतदार याद्या ७ जून २०२३ पर्यंत किंवा त्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. त्या टप्प्यापासून सुरू करण्यात येणार आहेत. ज्या सहकारी संस्थांच्या निवडणूकीकरीता ८ जून ते २१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत प्रारूप अथवा अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

अशा सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूकांकरीता १ ऑक्टोबर २०२३ या अर्हता दिनांकावर नव्याने प्रारूप मतदार याद्या तयार करावयाच्या आहेत. ज्या प्रलंबित सहकारी संस्थांच्या निवडणूकांकरीता प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत, अशा प्रलंबित सहकारी संस्थांच्या निवडणूकांकरीता प्रारूप मतदार याद्या तयार करण्यासाठी आवश्यकतेनुसार अर्हता दिनांकाबाबतचे प्रस्ताव कारणमिमांसा नमुद करून प्राधिकरणास सादर करणे आवश्यक आहे.

संघीय संस्थांच्या निवडणूकांकरीता सभासद संस्थांनी प्रतिनिधी नियुक्तीचे ठराव जिल्हा, तालुका, प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी यांना सादर केलेले असल्यास पुन्हा ठराव मागविण्याची आवश्यकता नाही. तथापि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम २०१४ चे नियम १० (४) मध्ये नमुद केलेल्या परिस्थितीत बदल करण्याची मुभा असलेले बदल जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी स्विकारावेत.

दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिक घर ऑफिस सोडून रोडवर..

नवीन अर्हता दिनांकामुळे सभासद संस्था, नव्याने पात्र होत असल्यास अशा संस्थांकडून प्रतिनिधी नियुक्ती ठराव मागविण्याची प्रक्रिया जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी करावी, असेही राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून कळविले आहे.

कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार, उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ

English Summary: Big news! The moratorium on the elections of cooperative societies has been lifted, from October 9, elections will be held by preparing a new format list...
Published on: 04 October 2023, 09:54 IST