Sugar Factories : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षी ऊसाची तोड लवकर न झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे या वर्षी लवकर कारखाने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
जळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने लवकरच सुरू होणार आहेत. अनेक वर्षांपासून बंद असलेले सहकारी साखर कारखाने (Sugar Factory) लवकरच सुरु होणार आहेत. जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
7th Pay Commission: खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांना या दिवशी मिळणार मोठी भेट!
जळगाव जिल्ह्यात सहकारी साखर कारखाने बंदावस्थेत आहेत. हे साखर कारखाने सुरु करण्याबाबत आता महत्त्वाचा निर्णय झालेला असून याबाबत जिल्हा बँकेच्या वतीने पाठपुरावा केला जात आहे. त्यामुळे आता अनेक दिवसांपासून बंद असलेले साखर कारखाने सुरु होणार असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गोड बातमी मिळाली आहे.
शनिवारी जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेची 106 वी सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्यासह संचालक यांची बैठकीला उपस्थिती होती. यावेळी जिल्हा बँकेशी संबंधित विविध विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली.
धानुका अँग्रीटेक कडून नाशिकमध्ये द्राक्ष तज्ञांचा मेळावा आयोजित
सहकारी साखर कारखाने सुरु करण्याबाबतचा महत्त्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. ही जळगाव जिल्ह्यातील साखर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने सद्यस्थितीत बंद अवस्थेत आहेत. यात चोपडा साखर कारखाना, बेलगंगा साखर कारखाना, मधुकर सहकारी साखर कारखाना यांचा समावेश आहे. विक्रीस काढलेले हे साखर कारखाने भाडेतत्त्वावर सुरू करण्याबाबतचा निर्णय झालेला आहे.
तर मधुकर सहकारी साखर कारखान्याबाबतही विक्रीला प्रतिसाद मिळत नसल्याने तो भाडेकरारावर देण्याबाबतचा प्रस्ताव आला असून त्यावर सुद्धा लवकरात लवकर निर्णय होईल.
रेशन कार्ड धारकांना मिळणार मोफत आरोग्य उपचार, जाणून घ्या कसे
Published on: 18 September 2022, 09:38 IST