गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. आता शिवसेनेतील अपात्र आमदारांच्या नोटीसबाबत मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व आमदारांना आज दुपारी बारा वाजेपर्यंत उपस्थित राहण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्या आहेत.
यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत माहिती ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेप्रकरणावर आजपासून सुनावणीला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आज दुपारी १२ वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी ठाकरे गटाने मोठी रणनीती आखली असल्याची देखील माहिती समोर आली आहे.
आज होणाऱ्या सुनावणीला कसे सामोरे जायच याबाबत ठाकरे गटाकडून नियोजन देखील करण्यात आल आहे. यामुळे काय निकाल लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे मुंबईत हालचाली सुरू झाल्या आहेत.
या सुनावणीला सुरुवात होण्याआधी ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक मुंबईमध्ये बोलवण्यात आली आहे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या मुंबईतील कार्यालयात ही बैठक होणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून मदत जाहीर करा- स्वाभिमानीची मागणी
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांना आपले म्हणण्याचे मांडण्यास सांगितले तरच ठाकरे गटाचे आमदार स्वतः आपली भूमिका मांडतील. त्यामुळे आता या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिंदे की ठाकरे कोणाचे आमदार अपात्र ठरणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असले तरी इतर पक्षांचे देखील याकडे लक्ष लागले आहे. यावर अनेक घडामोडी अवलंबून आहेत.
शेतकऱ्यांनो डेअरी उघडण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी, होईल फायदा...
Published on: 14 September 2023, 10:43 IST