देशात कांद्याचे सर्वत्र उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात देखील कांद्याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. आपल्या राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात, खांदेशात, मराठवाड्यात तसेच कोकणात देखील कांद्याची शेती नजरेस पडते. पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात कांद्याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते म्हणुनच या जिल्ह्याला कांद्याचे आगार असे संबोधले जाते. येथील शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण हे देखील कांदा पिकावरच अवलंबून असते.
आता याचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येतं आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हरियाणा कृषी विद्यापीठ, हिस्सारने HOS-3 नामक एक कांद्याची जात विकसित केली आहे. या कांद्याच्या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या जातीपासून केवळ उत्पादनचं चांगले मिळते असे नाही तर या कांद्याला साठवणुकीसाठी देखील चांगले मानले जातं आहे. कारण की या कांद्याला डोंगळे खुपच कमी येतील.
म्हणजेच ही कांद्याची जातं लवकर खराब होणार नाही. याची हिच विशेषता पाहून दक्षिण भारतातील एका खासगी बियाणे कंपनीने विद्यापीठाशी करार केला आहे, जेणेकरून ते देशातील इतर राज्यांतील शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यास सोपे होईल.
असा दावा केला जातो की, कांद्याच्या या जातीचे सरासरी उत्पादन हेक्टरी 350 क्विंटलपर्यंत आहे. या जातीचे कांदे हलके आणि कांस्य रंगाचे गोलाकार असतात. स्टोरेज दरम्यान त्यात फक्त 3.7 टक्के बोल्टिंग आणि 7.2 टक्के अंकुर फुटते.
याचाच फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचे सांगितलं जातं आहे. कंपनी आणि विद्यापीठ यांच्यातील करारानंतर आता या जातींचे कांद्याचे बियाणे इतर राज्यांतही पोहोचणार आहे. या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर आता सदर बियाणे कंपनी विद्यापीठाला परवाना शुल्क भरणार असून, त्याअंतर्गत बियाण्यांचे उत्पादन आणि विपणनाचे अधिक काम त्यांना मिळणार आहे. पुढील वर्षापासून शेतकऱ्यांना HOS-3 या कांद्याचे बियाणे मिळू शकेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
कमाई पिकाच्या जातीवरचं अवलंबून- कोणत्याही शेतकऱ्याचे उत्पन्न हे त्याच्या लागवडीचे तंत्र आणि पिकाच्या जातीवर बऱ्याच अंशी अवलंबून असते. त्यामुळेच शेतकऱ्यांनी बनावट वाण न वापरता सुधारित वाण निवडून लागवड करावी असा सल्ला दिला जातो. तसेच कांद्याचे बियाणे योग्य ठिकाणाहून खरेदी करण्याचा सल्ला कृषी शास्त्रज्ञ देत आहेत. कांद्याचा विचार केला तर त्यात पुसा रेड ही जातं खूपचं लोकप्रिय झाली आहे, जे प्रति हेक्टर 200 ते 300 क्विंटल देते. तसेच हिस्सार-2 मध्ये 300 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळतं असते.
सुधारित बियाणे वितरणासाठी झालेत 9 करार- यावेळी कुलगुरू प्रा. बी.आर.कंबोज म्हणाले की, विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन जोपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे अशा करारांच्या माध्यमातून येथून विकसित झालेले प्रगत वाण व तंत्र अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे, असा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. गेल्या एका वर्षात विविध पीक वाणांसाठी विविध खाजगी भागीदारांसोबत एकूण नऊ करार करण्यात आले आहेत, असे ते म्हणाले. निश्चितच कांद्याच्या या जातीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भविष्यात फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
Published on: 01 May 2022, 11:08 IST