News

शेतकऱ्यांना शेतीमध्ये पिकांची लागवड करण्यासाठी पैशाची आवश्यकता भासत असते. भांडवल विना शेती करणे जवळपास अशक्यच असते. जगात मातीविना शेती शक्य आहे मात्र पैशाविना शेती जवळपास अशक्यच यामुळे शेतकऱ्यांना भांडवल उपलब्ध करता करता अक्षरशा नाकी नऊ येतात. शेतकरी बांधवांना बँकेकडून देखील वेळेवर कर्ज उपलब्ध होत नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा शेतकरी बांधवांना नाईलाजाने सावकाराकडून कर्ज उचलावे लागत आहे. सावकारी कर्ज शेतकरी बांधवांना परवडनारे नसते. कधीकधी सावकारी कर्जाचे व्याज हे मुद्दल पेक्षा अधिक भरत असते यामुळे बळीराजा पुरता मेटाकुटीला येत असतो.

Updated on 20 April, 2022 7:25 PM IST

शेतकऱ्यांना शेतीमध्ये पिकांची लागवड करण्यासाठी पैशाची आवश्यकता भासत असते. भांडवल विना शेती करणे जवळपास अशक्यच असते. जगात मातीविना शेती शक्य आहे मात्र पैशाविना शेती जवळपास अशक्यच यामुळे शेतकऱ्यांना भांडवल उपलब्ध करता करता अक्षरशा नाकी नऊ येतात. शेतकरी बांधवांना बँकेकडून देखील वेळेवर कर्ज उपलब्ध होत नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा शेतकरी बांधवांना नाईलाजाने सावकाराकडून कर्ज उचलावे लागत आहे. सावकारी कर्ज शेतकरी बांधवांना परवडनारे नसते. कधीकधी सावकारी कर्जाचे व्याज हे मुद्दल पेक्षा अधिक भरत असते यामुळे बळीराजा पुरता मेटाकुटीला येत असतो. 

अनेकदा या कर्जाच्या ओझ्याखाली जगाचे पालन पोषण करणारा बळीराजा आपले जीवन संपवतो. मात्र आता देशातील सर्वात मोठी बँक अर्थात एसबीआयने शेतकऱ्यांसाठी एक भन्नाट योजना आणली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक भांडवल उपलब्ध होणार आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की शेतकऱ्यांच्या हितासाठी एसबीआयने सुवर्ण कर्ज योजना सुरु केली आहे. ही योजना निश्चितच शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. SBI बँक ही राष्ट्रीयकृत बँक आहे. त्यामुळे कमी व्याजदरात कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते. SBI च्या कृषी सुवर्ण कर्ज योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सोन्याच्या वस्तू तारण ठेवून कर्ज दिले जाते. आज आम्‍ही तुम्‍हाला SBI च्‍या गोल्ड लोन स्‍कीमबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

स्टेट बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी सुवर्ण कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत कोणताही शेतकरी त्याच्या शेतजमिनीच्या प्रतीसह सोन्याचे दागिने बँकेत देऊन त्याच्या गरजेनुसार कर्ज मिळवू शकतो. SBI ने या योजनेला 'Agriculture Gold Loan' असे नाव दिले आहे. या योजनेअंतर्गत कोणताही शेतकरी सोन्याचे दागिने बँकेत जमा करून त्याच्या इच्छेनुसार कर्ज घेऊ शकतो. परंतु, शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन असावी. लोन प्राप्त करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना शेतजमिनीच्या कागदाची प्रत बँकेत द्यावी लागते. एक तोळा सोन्याच्या दागिन्यांच्या बदल्यात बँकेकडून 22 हजार रुपयांचे कर्ज मिळते आणि सहा महिन्यांसाठी बँकेकडून 10% व्याज आकारले जाते.

या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन नसेल, पण त्याच्या नावावर ट्रॅक्टर असेल, तर त्या शेतकऱ्याला ट्रॅक्टरच्या आधारे सोन्याचे दागिने बँकेत जमा करून लोन घेता येईल. ही सुविधा निश्चितच भूमिहीन शेतकऱ्यांसाठी चांगली फायदेशीर ठरू शकते. मात्र ट्रॅक्टरची आरसी त्या संबंधित शेतकऱ्याच्या नावावर असावी, अशी अट आहे.

कृषी सुवर्ण कर्ज योजनेंतर्गत, कोणत्याही शेतकऱ्याने बँकेतून कर्ज घेण्यासाठी सोन्याचे दागिने जमा केले, तर ते दागिने बाजारातील पात्र सोनाराकडून तपासले जातील. तपासात जेवढे शुद्ध सोने सांगितले जाईल त्यानुसार कर्जाची रक्कम ठरवली जाईल. गोल्ड लोनची योजना विविध खाजगी कंपन्यांनीही सुरू केली असली, तरी त्याचा व्याजदर 20 टक्क्यांहून अधिक आहे, तर एसबीआयचा व्याजदर केवळ 10 टक्के आहे. यामुळे निश्चितच ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

सुवर्ण कर्जाचा उपयोग शिक्षण, लग्न, वैद्यकीय बिले इत्यादींसह विविध गरजा पूर्ण करण्यासाठी केला जाऊ शकते. या योजनेअंतर्गत 20 हजार ते 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेता येते. SBI गोल्ड लोन स्कीम 36 महिन्यांच्या कालावधीसाठी गोल्ड लोन, 36 महिन्यांसाठी लिक्विड गोल्ड लोन आणि 12 महिन्यांच्या कालावधीसाठी बुलेट रिपेमेंट गोल्ड लोन ऑफर करते. शेतकरी मित्रांनो जर आपण या योजनेअंतर्गत कर्ज घेऊ इच्छित असाल तर आपण आपल्याजवळच्या एसबीआय ब्रँचला भेट देऊन योजनेविषयी अधिक माहिती जाणून घेऊ शकता. 

English Summary: Big news SBI will give loan to farmers by pledging gold
Published on: 20 April 2022, 07:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)