News

2014 मध्ये सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना अमलात आणल्या आहेत. अशाच अनेक योजनांपैकी एक आहे पीएम किसान सम्मान निधि योजना. या योजनेचा देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र जी मोदी यांनी 2018साली शुभारंभ केला.

Updated on 05 March, 2022 9:11 AM IST

2014 मध्ये सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना अमलात आणल्या आहेत. अशाच अनेक योजनांपैकी एक आहे पीएम किसान सम्मान निधि योजना. या योजनेचा देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र जी मोदी यांनी 2018साली शुभारंभ केला.

या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपयेचे वार्षिक तीन हफ्ते अर्थात एका वर्षात सहा हजार रुपये हस्तांतरित केले जातात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 20,000 रुपये देण्यात आले आहेत, अर्थात या योजनेचे दहा हफ्ते शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहेत. नुकतेच एक जानेवारीला या योजनेचा दहावा हप्ता देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र जी मोदी यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. हा हप्ता देशातील सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.

राज्यातील देखील एक कोटी पाच लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनाही या योजनेचा दहावा हफ्ता सुपूर्द करण्यात आला आहे.

कोणाला मिळणार 4000 रुपये

पीएम किसान सम्मान निधि योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. या योजनेचा अद्याप ज्या शेतकऱ्यांनी कुठलाच लाभ घेतलेला नाही, मात्र योजनेचे सर्व निकष पूर्ण केले आहेत अशा पात्र शेतकऱ्यांना आता चार हजार रुपये देण्यात येणार आहेत. 

म्हणजेच जे नवीन पात्र शेतकरी या योजनेसाठी नोंदणी करतील त्यांना दहावा आणि आगामी अकरावा हफ्ता सोबतच दिला जाणार आहे. जर या योजनेसाठी नवीन शेतकऱ्यांनी 31 मार्च 2022 आधी आपले रजिस्ट्रेशन पूर्ण केले तर त्यांना येत्या 11 व्या हप्त्यात दहाव्या हफ्त्याची देखील रक्कम दिली जाणार आहे.

English Summary: big news regarding pm kisan now these farmers get 4000 under these scheme learn more about it
Published on: 05 March 2022, 09:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)