News

अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे रब्बी हंगामातील पिके संकटात आहेत. शेतकऱ्यांसमोर आधीच संकटे असताना आता नवीन एक संकट उभे ठाकले हवे. ते म्हणजे वीज पुरवठा. कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर दुरेही संकट उभे राहत आहे.

Updated on 27 January, 2022 4:19 PM IST

अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे रब्बी हंगामातील पिके संकटात आहेत. शेतकऱ्यांसमोर आधीच संकटे असताना आता नवीन एक संकट उभे ठाकले हवे. ते म्हणजे वीज पुरवठा. कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर दुरेही संकट उभे राहत आहे.

महावितरणकडून कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. एका कृषीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी 5 हजार रुपयांची मागणी केली जात आहे. जालना जिल्ह्यातील राजूर उपकेंद्रांतर्गत असलेल्या 30 गावांमधील तब्बल 4 हजार 200 कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

5 हजार ऐवजी 3 हजार रुपये अदा केल्यास विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी लोकप्रतिनीधीसह शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे महावितरण काय भूमिका घेणार यावरच शेतकऱ्यांसह रब्बी हंगामातील पिकांचे भवितव्य अवलंबून आहे.

शेतकऱ्यांना कोणतीही पुर्वसुचना न देता महावितरणने हा निर्णय झाला आहे. अचानक विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने पिकांना पाणी द्यावे कसे हा प्रश्न आहे शिवाय जनावरांना पाणी मिळणेही अवघड झाले आहे. महावितरणकडून प्रती कृषीपंपासाठी 5 हजार रुपये शेतकऱ्याने अदा केले तर विद्युत पुरवठा सुरळीत केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

घरगुती, औद्योगिक थकबाकीच्या कित्येक पटीने थकबाकी ही कृषीपंपाकडे आहे. वेगवेगळ्या योजना शिवाय सवलती देऊनही कृषीपंपाचे वीजबिल अदा करण्याकडे शेतकऱ्यांचे कायम दुर्लक्ष राहिलेले आहे. त्यामुळे आता शेवटचा पर्याय म्हणून असा निर्णय महावितरणला घ्यावा लागत आहे. सध्याची प्रतिकूल परस्थिती पाहता शेतकऱ्यांकडून 3 हजार रुपये घेऊनच विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी येथील लोकप्रतिनीधी यांनी केली आहे. दोन दिवसांपासून कृषीपंप बंद असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या वाढलेल्या आहेत.

English Summary: Big news: Power supply to agricultural pumps disrupted
Published on: 27 January 2022, 04:19 IST