बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याने नुकताच सर्वात जास्त बाजारभाव दिल्याच्या बातम्या नुकत्याच आल्या होत्या. यामुळे याची चर्चा झाली. असे असताना आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष सागर जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
यामुळे आता याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे आता माळेगाव साखर कारखान्याच्या राजकारणात खांडेपालट करण्यावर शिक्कामोर्तेब झाले. आता अजित पवार काय निर्णय घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
बाळासाहेब तावरे यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदी साडेतीन वर्ष काम पाहिले. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव कारखाना अर्थिक दृष्ट्या सक्षम ठेवणे आणि सभासदांना सर्वाधिक पैसे देणे, ही बाब केंद्रस्थानी ठेवून खरेतर मी संचालकांच्या मदतीने काम केले.
भरघोस नफ्यासाठी मधमाशीपालन आहे फायदेशीर, एका महिन्यात लाखोंचा नफा मिळेल नफा...
वयोमानानुसार माझी तब्बेत साथ देत नाही. मी माझ्या वैयक्तीक कारणास्तव राजीनामा देत आहे, असे तावरे म्हणाले. उपाध्यक्ष जाधव यांनीही आपला एक वर्षाचा कार्य़काळ संपल्यानंतर राजीनामा देत असल्याचे सांगितले.
हे राजीनामे संचालक मंडळापुढे मंजूरीसाठी ठेवले जातील, अशी माहिती प्रशासनाकडून सांगण्यात आली. आता नवीन अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता अध्यक्षपदासाठी केशवराव जगताप, योगेश जगताप, नितीन सातव सुरेश खलाटे हे संचालक इच्छुक आहेत.
शेतकऱ्यांनो बांबूची लागवड आहे खूपच फायदेशीर, सरकारही करत आहे मदत, जाणून घ्या..
यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका वरिल पदाधिकारी निवडीमध्ये महत्वपुर्ण ठरणार आहे. यामुळे अध्यक्ष कोण होणार हे लवकरच समजेल. याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! मान्सून पुन्हा एकदा होणार सक्रिय, 'या' दिवशी राज्यात धो- धो बरसणार
Published on: 06 September 2023, 12:11 IST