News

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीला काही अटींसह परवानगी दिली आहे. त्यामुळे आता राज्यामध्ये बैलगाड्या शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी अनेकांनी मोठा आनंद व्यक्त केला. यामुळे सध्या राज्यात विविध ठिकाणी बैलगाड्या शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहे.

Updated on 04 February, 2022 12:17 PM IST

काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीला काही अटींसह परवानगी दिली आहे. त्यामुळे आता राज्यामध्ये बैलगाड्या शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी अनेकांनी मोठा आनंद व्यक्त केला. यामुळे सध्या राज्यात विविध ठिकाणी बैलगाड्या शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहे. अशातच बैलगाडी शर्यतीत एक दुर्घटना घडली आहे. यामध्ये काहीजण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे 2 फेब्रुवारी 2022 मध्ये बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे पदाधिकारी शैलेश काते यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव समुद्रकिनारी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेदरम्यान अचानक बैल उधळले आणि स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये बैलगाडी घुसली. यामुळे बघणारे प्रेक्षक पळू लागले. यावेळी एकच गोंधळ उडाला. या दुर्घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. राज्य सरकारने न्यायालयाच्या आदेशानंतर बैलगाडी शर्यतींना सशर्त परवानगी दिली, मात्र काही ठिकाणी सुरक्षा ही रामभरोसे असल्याचे चित्र या घटनेतून समोर आले आहे. बैलगाडी शर्यतीदरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मागील 5 ते 6 वर्षे बैलगाडी शर्यतीवर बंदी होती. यामुळे अनेकजण नाराज झाले होते, अनेकांनी इच्छा नसताना आपल्याकडील बैलजोडी विकून टाकल्या होत्या. अनेकांना यावर होणार खर्च देखील परवडत नव्हता. आता बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा बैलगाडी शर्यतींना परवानगी मिळाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी याचे आयोजन केले जात आहे. मात्र हे अनेकांच्या जीवावर बेतले आहे. यामुळे परवानगी दिल्यानंतर देखील नियम पाळले नाहीत, तर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

यामध्ये बैलगाडी शर्यतीची धावपट्टी ही अतिशय उतार असलेली, दगड किंवा खड़क असलेली, चिखल, दलदल असलेली, पाणथळीची किंवा पातळ चिखल असलेले ठिकाण असलेली नसावी. बेलगाडी शर्यंत रस्त्यावर किंवा महामागांवर आयोजित करण्यात येऊ नये, तसेच त्यांना मारू नये, त्यांना कसल्याही प्रकारचे मद्य देखील देऊ नये, अशा अनेक अटींचा समावेश आहे. मात्र प्रत्यक्षात त्या किती पाळल्या जातात, याची काळजी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.

English Summary: Big news! Many injured in bullock cart race accident, spectators flee
Published on: 04 February 2022, 12:17 IST