News

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) मंत्रिमंडळानं आपल्या तिसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेतले आहेत. या बैठकीत ठाकरे सरकारनं घेतलेला औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर तर उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्याचा निर्णय पुन्हा घेण्यात आला.

Updated on 16 July, 2022 2:27 PM IST

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) मंत्रिमंडळानं आपल्या तिसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेतले आहेत. या बैठकीत ठाकरे सरकारनं घेतलेला औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर तर उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्याचा निर्णय पुन्हा घेण्यात आला.

ठाकरे सरकारनं शेवटच्या क्षणी घेतलेला हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं स्थगित केला होता. महाविकास आघाडी सरकारने औरंगाबाद, उस्मानाबाद शहराचे नाव बदलले होते. मात्र, आता शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा नामांतर केले आहे.

त्यानुसार औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला आहे. तर उस्मानाबादचं नाव धाराशिव असंच राहणार आहे. ठाकरे सरकारनं शेवटच्या क्षणी घेतलेला हा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं स्थगित केला होता.

मोठी बातमी : ‘या’ योजनेचे 26 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा; तब्बल ‘इतक्या’ शेतकऱ्यांची केली निवड

आजच्या बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबाद शहराच्या नामांतरासह नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याचा पुनर्निणय घेण्यात आला. लवकरच ठराव करुन प्रस्ताव केंद्राला पाठवणार असल्याची माहिती बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Money Plant: घरात मनी प्लांट लावल्याने होतात 'हे' मोठे बदल ; वास्तुशास्त्र काय सांगतंय? वाचा..

English Summary: Big news: If it's decided! Aurangabad, renaming the city Osmanabad
Published on: 16 July 2022, 02:27 IST