News

Pm Kisan Sanman Nidhi Yojna : मित्रांनो मायबाप शासन (Central Government) भारतातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक योजना राबवत असते. या शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुरु केल्या जातात.

Updated on 23 April, 2022 1:51 PM IST

Pm Kisan Sanman Nidhi Yojna : मित्रांनो मायबाप शासन (Central Government) भारतातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक योजना राबवत असते. या शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुरु केल्या जातात.

यापैकीच अंमलात असलेली एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Modi Government). या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये करून वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. 

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी (Prime Minister Hon'ble Shri Narendraji Modi) यांनी पीएम किसान योजनेचा 10वा हप्ता योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला होता. शेतकरी आता या योजनेच्या 11व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांच्या खात्यात कोणत्याही दिवशी दोन हजार रुपये येऊ शकतात.

बातमी कामाची:-Beekeeping : मधमाशी पालन करून अवघ्या काही महिन्यातच बना श्रीमंत; सरकार देणार 90 टक्के अनुदान

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्या शेतकऱ्यांना 11वा हप्ता मिळणार नाही. जर तुम्ही देखील ई-केवायसी पूर्ण केली नसेल तर लवकरात लवकर तुमची ई-केवायसी पूर्ण करून घ्या, कारण सरकारने आता केवायसी अनिवार्य केली आहे.

मात्र, शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आता ई-केवायसी करण्यासाठी सरकारने नियमात बदल केले आहेत. पूर्वी, जिथे ही प्रक्रिया केवळ ओटीपीद्वारे पूर्ण केली जात होती, आता शेतकऱ्यांना जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक्सची प्रक्रिया पूर्ण करावी लागतं आहे.

बातमी कामाची:-मोठी बातमी! सोने तारण ठेऊन SBI देणार शेतकऱ्यांना 'एवढे' लोन

या पद्धतीने चेक करा योजनेचे स्टेटस

»सर्वप्रथम https://pmkisan.gov.in/  या वेबसाइटवर जा.

»आता तुम्हाला 'फार्मर्स कॉर्नर' हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करा.

»त्यानंतर लाभार्थी स्थितीवर क्लिक करा.

»आता तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव टाका.

»त्यानंतर 'Get Report' पर्यायावर क्लिक केल्यावर संपूर्ण यादी उघडेल.

»या यादीत तुम्ही तुमच्या पीएम किसान सम्मान निधि योजनेच्या हप्त्याचे तपशील पाहू शकता.

बातमी कामाची:-Royal Enfield : 33 हजारात घरी न्या रॉयल इनफिल्डची 'ही' बाईक

या शेतकऱ्यांना नाही मिळणार याचा लाभ

जे शेतकरी कोणत्याही संवैधानिक पदावर आहेत त्यांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही विभागात किंवा PSU किंवा कोणत्याही सरकारी संस्थेत काम करणारी व्यक्ती या योजनेसाठी पात्र असणार नाही. दुसरीकडे संस्थागत शेतकरीही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.

English Summary: Big news! If e-KYC is not done in this manner, PM Kisan's 11th week will not be credited to the bank
Published on: 23 April 2022, 01:51 IST