News

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Updated on 22 June, 2022 10:23 AM IST

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. राज्यपालांना आज सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत लवकरच अधिकृत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.

मागील दोन दिवसांपासून राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लक्षणे दिसत होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. मंगळवारी रात्री त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना आज सकाळी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मोठी बातमी! राज्यात खळबळ; बाळासाहेब थोरात राजीमाना देणार? सूत्रांची माहिती

राज्यात मागील दोन दिवसांपासून वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. अशा स्थितीत राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मात्र, आता राज्यपाल रुग्णालयात दाखल झाल्याने राजकीय घडामोडींबाबत अनेक प्रश्ननिर्माण झाले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर राज्यपाल राज्य सरकारला विश्वास मत सिद्ध करण्याच्या सूचना देण्याची शक्यता होती. आता राज्यपाल रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला किमान सात दिवसांचा अवधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

'मी पुन्हा येईन' चा प्रयोग होणार यशस्वी? एकनाथ शिंदे भाजपच्या राज्यात दाखल..

English Summary: Big news! Governor Bhagat Singh Koshyari infected with corona
Published on: 22 June 2022, 10:23 IST