News

देशात कोरोना व्हायरससारखा महाभंयकर आजाराने आपल्या विळख्यात अनेक उद्योगांना घेतले आहे. यामुळे देशाची अर्थिकस्थिती ही डबघाईला आली आहे. शेतकऱ्यांनाही या लॉकडाऊनचा फटका बसला आहे. अनेकांना आपला शेतमाला सडू द्यावा लागला.

Updated on 26 May, 2020 10:52 AM IST


देशात कोरोना व्हायरससारखा महाभंयकर आजाराने आपल्या विळख्यात अनेक उद्योगांना घेतले आहे. यामुळे देशाची अर्थिकस्थिती ही डबघाईला आली आहे. शेतकऱ्यांनाही या लॉकडाऊनचा फटका बसला आहे. अनेकांना आपला शेतमाला सडू द्यावा लागला. दरम्यान शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी एक गिफ्ट देण्याच्या विचारात आहे.

सरकार खरीप पिकांच्या किंमतीत सुधारणा करणार असून मिनिमम सपोर्ट प्राईस (एमएसपी) किमान आधारभूत किंमत वाढविण्याचा विचार करत आहे. सीएसीपीने (कमीशन फॉर एग्रीकल्चर कॉस्ट्ल एंड प्राईसेज) ने याविषयीच्या शिफारसी सरकारकडे सोपवल्या आहेत. लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे. जर सरकारने यासाठी मंजूरी दिली तर शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते सीएसीपीच्या प्रस्तावावरून अन्न आणि इतर संबंधित मंत्रालयांशी सातवेळा चर्चा करण्यात येत आहे. चर्चा झाल्यानंतर या प्रस्तावाला मंजूरीसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवले जाईल.

खालीलप्रमाणे एमएसपी वाढविण्याची शिफारस करण्यात आली आहे.
धानच्या एमएसपीमध्ये ५३ रुपयांची वाढ
ईटीच्या माहितीनुसार, सीएसीपीने खरीपाच्या ११७ पिकांचा एमएसपी वाढविण्याची शिफारस करण्यात आली आहे. यात धान प्रमुख आहे. सीएसीपीने धान(ग्रेड-ए) च्या एमएसपीच्या २.९ टक्क्यांनी वाढवून १८८८ रुपये प्रति क्किंटल करण्याची मागणी केली आहे. जर सीएसीपीची मागणी मान्य केली जाते तर धानच्या एमएसपीमध्ये ५३ रुपयांची वाढ होणार आहे. याचप्रकारे सामान्य धानच्या एमएसपीला १८१५ रुपयांनी वाढवून १८६८ प्रति क्किंटल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कापसाच्या किंमतीत २६० रुपये वाढविण्याची मागणी
सीएसपीने कापसाच्या एमएसपीत २६० रुपये प्रति क्किंटलने वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या कॉटन मीडियम स्टेपलच्या एमएसपी ५२५५ रुपये प्रति क्किंटल आहे. यात वाढ करून ५५१५ रुपये प्रति क्किंटल करण्याची मागणी केली आहे. याचप्रमाणे कॉटन लॉन्ग स्टेपल च्या एमएसपीला ५५५० रुपये प्रति क्किंटलने वाढवून ५८२५ रुपये प्रति क्किंटल करण्याची मागणी आहे.

डाळींच्या किंमतीतही होणार वाढ
सीएसीपीने खरीपातील मुख्य तूर, उडीद, आणि मूग डाळ असतात. याच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीएसीपीने तूर दाळची एमएसपी ५८०० रुपयांनी वाढवून ६ हजार प्रति क्किंटल, तर उडीद डाळच्या एमएसपीच्या ५७०० ते ६ हजार रुपये प्रति क्किंटल आणि मूग डाळच्या एमएसपी ७०५० रुपयांनी वाढवून ७ हजार १९६ रुपये प्रति क्किंटल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

English Summary: Big News : government likely increased msp; paddy, pulses, cotton price will up
Published on: 25 May 2020, 06:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)