News

आता अहमदनगर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या एफआरपी रकमेचा प्रश्न अखेर वर्षभराने मार्गी लागला आहे. यामध्ये सन 2020-21 मधील एफआरपी रक्कम ही नागवडे सहकारी (Sugar Factory) साखर कारखान्याकडे होती. या रकमेतील 63 लाख 79 हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचे आदेश नगर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने सुनावणी दरम्यान दिले आहे.

Updated on 20 May, 2022 5:30 PM IST

अहमदनगर, यावर्षी ऊस उत्पादक शेतकरी अनेक अडचणींना सामोरे जात आहे. अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला असताना अनेक कारखान्यांनी एफआरपीचे पैसे दिलेले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचा संघर्ष काही केल्याने संपताना दिसत नाही. असे असताना आता अहमदनगर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या एफआरपी रकमेचा प्रश्न अखेर वर्षभराने मार्गी लागला आहे.

यामध्ये सन 2020-21 मधील एफआरपी रक्कम ही नागवडे सहकारी (Sugar Factory) साखर कारखान्याकडे होती. या रकमेतील 63 लाख 79 हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचे आदेश नगर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने सुनावणी दरम्यान दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे येथील शेतकरी आनंदात आहेत.

श्रीगोंदा सहकारी कारखानाच्या गाळप हंगाम एफआरपीची शिल्लक रक्कम बाकी होती. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. याबाबत ऊस उत्पादक शेतकरी भाऊसाहेब पवार यांनी माहिती अधिकारात पाठुपरावा केला होता. यामध्ये याबाबतची माहिती समोर आली होती. याबाबत माहिती निदर्शनास येताच पैसे देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

मोठी बातमी! राज्यात पुन्हा शेतकऱ्यांनाचा संप? सोमवारी होणार मोठा निर्णय

यामुळे शेतकऱ्यांनी एकच आनंद व्यक्त केला आहे. प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने केलेल्या सुनावणीचा परिणाम इतरत्रही होऊ शकतो. यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे लक्ष आता आपल्या कारखान्यांकडे लागले आहे. यामुळे आता इतर शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यापर्यंत पाठपुरावा केल्याने हा प्रश्न मार्गी लागला आहे. शेतकरी याबाबत आक्रमक झाले होते. यामुळे अखेर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या;
कृषी विकास दराबाबत आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना मोठा दिलासा..
पुराच्या पाण्यात पाय भिजतील म्हणून भाजप आमदार कर्मचाऱ्याच्या पाठीवर
40 गोणी कांदा, शेतकऱ्याला आडतवाल्यालाच द्यावे लागले 7 रुपये, सांगा कसा जगणार शेतकरी

English Summary: Big news! FRP money will be credited to farmers' accounts, orders of Joint Director of Sugar
Published on: 20 May 2022, 05:30 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)