रेशीम उत्पादकांसाठी मोठी बातमी; राज्य सरकारकडून ६२.७४ लाख रुपयांचा निधी वितरित

08 October 2020 02:40 PM By: भरत भास्कर जाधव

 

राज्यातील रेशीम बीज  कोष उत्पादक शेतकऱ्यांनी  विक्री केलेल्या कोषाची रक्कम अदा करण्यासाठी व नवीन अंडी पूंज निर्मितीसाठी  महाराष्ट्र सरकारकडून  ६२. ७४ लाख  रुपयांचा निधी  वितरित करण्यात आला. या संदर्भात राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री  राजेंद्र पाटील यड्रावर यांनी  सदर निधी वितरित करण्यास मान्यता दिली. त्यानुसार सदर निधी नागपूर येथील रेशीम संचालनालयाचे संचालक यांना वितरित करण्यात आला आहे.

 राज्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना  दर्जेदार अंडीपुंजाचा पुरवठा व्हावा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे  महाराष्ट्र सरकारचे तुती अंडीपुंज निर्मिती केंद्र आहे. अंडी पुंज तयार करण्यासाठी  बीज कोषाची खरेदी या केंद्रामार्फत करण्यात येते. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व आसपासच्या परिसरातील शेतकरी तुती रेशीम तसेच गडचिरोली , भंडारा, चंद्रपूर व गोंदिया  जिल्ह्यातील लाभार्थी किंवा  लाभार्थी शेतकरी टसर रेशीम कोषाचे उत्पादन घेऊन अंडीपंजू केंद्रामध्ये  विक्री करतात. कोरोनामुळे ही निर्मिती केंद्र बंद होते, मात्र रेशीम संचालनालयामार्फत  शेतकऱ्यांना  अंडीपुंजाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यात आला होता. 

यादरम्यान राज्यातील रेशीम बीज कोष उत्पादक शेतकऱ्यांनी  विक्री केलेल्या कोषाची रक्कम करण्यासाठी  शासनामार्फत निधीची आवश्यकता होती. याबाबत मुंबई येथे वस्त्रोद्योग राज्यमंत्री यड्रावर यांच्याप्रमुख उपस्थितीत रेशीम कोष संदर्भात केंद्र शासनाकडून आलेल्या निधीमध्ये राज्य सरकार सहभाग अनुदानाची  तरतुद करणे बाबत  आढावा  बैठक पार पडली.

 

state government silk growers रेशीम उत्पादक राज्य सरकार महाराष्ट्र सरकार Government of Maharashtra वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावर Minister of State for Textiles Rajendra Patil Yadravkar
English Summary: Big news for silk growers, Rs 62.74 lakh disbursed by the state government

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.