1. बातम्या

मुंबईकरांसाठी मोठी बातमी ; आज रात्रीपासून जमावबंदी लागू

मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.  आज म्हणजेच १ जुलैच्या मध्यरात्रीपासून ते १५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान सकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांनाच बाहेर पडण्याची परवानगी देण्यात येईल.  मुंबई पोलीस आयुक्तालायाने पत्रकाद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. तसेच मुंबईतील करोनाग्रस्तांची संख्या ७५ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. मिशन बिगिनला सुरूवात झाल्यानंतर मर्यादित कामगारांच्या मदतीने अनेक खासगी कार्यालयेही सुरू करण्यात आली होती.  सुट दिल्यानंतर अनेक ठिकाणी गर्दीही झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा मुंबईत जमावबंदी लागू करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त प्रणय अशोक यांनी घेतला आहे.

यापूर्वी मिशन बिगीन अंतर्गत सरकारने मोठी सुट दिली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्यात, तसेच प्रामुख्याने मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे आज मध्यरात्रीपासून  मुंबईत जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यापूर्वीप्रमाणे रात्री ९ ते सकाळी ५ या दरम्यान कर्फ्यू लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना यादरम्यान प्रवासाची मुभा असेल. तसेच सर्वसामान्यांना कामासाठी केवळ दोन किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पोलीस आयुक्त प्रणय अशोक यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters