News

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आणि तिच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. गौतमी पाटील हिच्या वडिलांचे निधन झाले आहे. यामुळे दुःख व्यक्त केले जात होते.

Updated on 05 September, 2023 10:10 AM IST

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आणि तिच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. गौतमी पाटील हिच्या वडिलांचे निधन झाले आहे. यामुळे दुःख व्यक्त केले जात होते.

तीन दिवसांपूर्वी गौतमीचे वडील रवींद्र पाटील हे धुळ्यात बेवारस अवस्थेत सापडले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची तब्येत खालावली होती.

त्यानंतर गौतमीने त्यांच्यावर पुण्यात उपचार करणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्यांचे निधन झाले आहे. गौतमी पाटील ही तिच्या वडिलांपासून वेगळी रहात होती.

त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. पुण्यातील चिंतामणी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धनकवडी येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते बेवारस अवस्थेत सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती.

आई आणि वडील पूर्वीच वेगळे झाल्याने गौतमी आईसोबत राहाते. जेव्हा गौतमी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली तेव्हा तिचे वडीलदेखील माध्यमांमध्ये झळकले होते. त्यांची देखील चर्चा सुरू झाली होती.

असे असताना मात्र मागच्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. धुळ्यातील दुर्गेश चव्हाण यांना रवींद्र पाटील हे बेवारसपणे पडलेले आढळून आले होते. सुरुवातीला ते कोण आहेत, याची त्यांना जाणीव नव्हती.

त्यांनी रविंद्र पाटील यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या खिशातील आधार कार्डमुळे त्याचं नाव कळाले. चव्हाण यांनी सोशल मीडियात त्यांच्याबद्दल माहिती टाकली. त्यानंतर ते गौतमीचे वडील असल्याचे लक्षात आले होते.

काळ्या पेरूच्या लागवडीने चमकेल शेतकऱ्यांचे नशीब, अनेक वर्षे होईल बंपर कमाई

English Summary: Big news! Famous dancer Gautami Patil's father passed away, breathed his last in a hospital in Pune.
Published on: 05 September 2023, 10:10 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)