राज्यातील सर्वच सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका पुढे ढकल्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुक कार्यक्रम ३० सप्टेंबरनंतर जाहीर करण्याचा सहकार विभागाने निर्णय घेतला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अनेक सहकारी संस्थांमधील सभासद शेतकरी खरीप हंगामातील शेतीच्या कामामध्ये गुंतलेले असतात. त्यामुळे ते मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू शकतात, असे कारण यासाठी दिले आहे. यामुळे सहकार विभागाने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.
दरम्यान, राज्यात मान्सूनचे दमदार आगमन झाले असून, ३० जूननंतर राज्यभरात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वच सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका पुढे ढकल्यात आल्या आहेत.
"FRP मध्ये केलेली वाढ म्हणजे डोंगर पोखरुन हाती लागलेली उंदराची पिल्ली"
यामध्ये निवडणुकीस पात्र असणाऱ्या सहकारी संस्थांची संख्या ८२ हजार ६३१ आहे. त्यातील ४९ हजार ३३३ सहकारी संस्थांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत.
मत्स्य उत्पादनात भारताचा जगात तिसरा क्रमांक
४८ हजार ६६७ संस्थांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. अशा संस्थांपैकी ४२ हजार १५७ संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सहा हजार ५१० सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यामुळे इच्छुकांना काही काळ थांबावे लागणार आहे.
अभिमानास्पद ! IFAJ मध्ये भारताचा 61 वा सदस्य देश म्हणून समावेश
जनावरांच्या आहारात बुरशीयुक्त चारा येण्याची प्रमुख कारणे
पंजाबचे पशुपालक स्वच्छ व निर्भळ दूध उत्पादनासाठी काय करतात? जाणून घ्या..
Published on: 30 June 2023, 10:46 IST