जालनाः शिवसेनेचे जालन्याचे आमदार अर्जून खोतकर (Arjun Khotkar) यांनी अखेर एकनाथ शिंदे गटाला पाठींबा जाहीर केला आहे. पत्रकार परिषदेतून त्यांनी आपला निर्णय जाहीर केला. यावेळी ते प्रचंड भावूक झाले होते.
शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी आज अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाण्याचा निर्णय घोषित केला. पत्रकार परिषदेतून त्यांनी आपला निर्णय जाहीर केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या परवानगीने, परिवारासाठी मी हा निर्णय घेतोय, हे सांगताना त्यांचे डोळे भरून आले.
मागच्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील आक्रमक नेते अर्जुन खोतकर हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती. आता त्यांनी स्वत: आपण शिंदेगटाला समर्थन देत असल्याचं जाहीर केले आहे. हे सांगताना त्यांचे डोळे भरून आले होते.
पिक्चर अभी बाकी है! उद्धव ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा दिलाच नाही, कारण..
शेतकऱ्यांच्या आयुष्यात दरवळेल पैशांचा सुगंध! वेलची लागवड करा आणि लाखो कमवा
अर्जुन खोतकर म्हणाले, मी सच्चा शिवसैनिक आहे. ४० वर्षापासून. घरी आल्यावर परिवार दिसतो. त्यामुळे काही निर्णय करण गरजेचं आहे. मी उद्धव ठाकरेंकडे परवानगी मागितली. त्या संदर्भात जे काही बोलायचं ते बोलले. मी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे.
Rules Change: सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; 1 ऑगस्टपासून होणार मोठे बदल
Published on: 30 July 2022, 11:48 IST