सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील चिंदर येथे तीन दिवसांत ३१ शेतकऱ्यांच्या तब्बल ४१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
चाऱ्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केला आहे. ऐन खरीप हंगाम सुरू असताना हा प्रकार झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यामुळे शेतकरी मदतीची मागणी करत आहेत.
जनावरे एका पाठोपाठ एक अशी जनावरे मृत होऊ लागली. तीन दिवसांत आतापर्यंत ३१ शेतकऱ्यांची तब्बल ४१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. जनावरांना तीन दिवसांपूर्वी अचानक त्रास जाणवू लागला. त्यानंतर एक एक जनावराचा मृत्यू होऊ लागला.
यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या प्रकाराची कल्पना पशुसंवर्धन विभागाला दिल्यानंतर पशुसवर्धंन सहआयुक्त डॉ. प्रशांत कांबळे, जिल्हा उपायुक्त डॉ. अतुल डांगोरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विद्यानंद देसाई यांनी परिस्थितीची आढावा घेतला.
चाऱ्यातून सायनाईड विषबाधा झाल्यामुळेच जनावरांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज डॉ. कांबळे यांनी व्यक्त केला. परंतु तरीही पुणे प्रयोगशाळेचे पथक येऊन आवश्यक रक्त नमुने, चारा नमुने घेणार आहेत. यानंतर खरी परिस्थिती माहिती होईल.
मला न विचारता टोमॅटो का वापरले.? बायकोला आला राग आणि नवऱ्याला सोडून गेली माहेरी....
डाळींबाची कोण जात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त, जाणून घ्या..
सदाभाऊ टोमॅटोच्या दरावरुन आक्रोश करणाऱ्या शहरी नागरिकांवर भडकले, म्हणाले थोड्या दिवसांनी सरण रचायलाही टोमॅटो देऊ...
Published on: 15 July 2023, 11:18 IST