News

देशांतर्गत कांद्याच्या मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक दाखल झाल्याने कांद्याची नगरी असलेल्या लासलगावातमध्ये

Updated on 01 March, 2022 2:00 PM IST

लासलगाव : देशांतर्गत कांद्याच्या मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक दाखल झाल्याने कांद्याची नगरी असलेल्या लासलगावातमध्ये कांद्याच्या बाजार भावात साडे पाचशे रुपये प्रतिक्विंटलने घसरण झाली. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

देशांतर्गत गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान येथील शिखर तसेच पश्चिम बंगाल येथील सुखसागर या ठिकाणी लाल नवीन 

कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. तसेच राज्यात नाशिक, अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील चाकण आणि सोलापूर या भागातही नवीन उन्हाळ कांद्याची लाल कांद्याच्या बरोबरीने आवक येत असल्याने याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजार भावावर झाला आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कांदा बाजार आवारावर शनिवारच्या तुलनेत आज सोमवारी कांद्याच्या कमाल बाजारभावात साडे पाचशे रुपयांनी घसरण झाली आहे.

गेल्या शनिवारी १ हजार २३३ वाहनातून १७ हजार ८२६ क्विंटल कांद्याची आवक होऊन कमाल २६२५ रुपये, किमान ६५१ रुपयेतर सर्वसाधारण २१०० रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला होता. तर सोमवारी १ हजार ८५० वाहनातून ३२ हजार ५०० क्विंटल कांद्याची आवक लासलगाव बाजार समितीत दाखल झाली. कमाल २०७७ रुपये, किमान ९०० रुपये तर सर्वसाधारण १७५० रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

देशांतर्गत कांद्याच्या मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक दाखल झाल्याने कांद्याची नगरी असलेल्या लासलगावातमध्ये कांद्याच्या बाजार भावात साडे पाचशे रुपये प्रतिक्विंटलने घसरण झाली. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

देशांतर्गत गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान येथील शिखर तसेच पश्चिम बंगाल येथील सुखसागर या ठिकाणी लाल नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. 

English Summary: Big limit onion coming market rate decrease
Published on: 01 March 2022, 02:00 IST