शेतीमध्ये विविध हंगामी पिके घेतली जातात त्यामध्ये रब्बी हंगाम, खरीप हंगाम तसेच फुलशेती आणि फळशेती. याच्या माध्यमातून वेगवेगळी पिके घेतली जातात. मुख्यत्वे फळबागां मध्ये पेरू, चिक्कू, आंबा, केळी या फळ झाडांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात असायची.
परंतु गेल्या काही वर्षांत ड्रॅगन फ्रूट चे लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे शिवाय इतर फळांच्या तुलनेत या फळाला पाणी अत्यंत कमी प्रमाणत येते शिवाय माळरानावर असलेल्या जमिनीवर हे फळं झाड योग्यरीत्या वाढते. बाजारात ड्रॅगन फ्रूट ला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे शिवाय आतंरराष्ट्रीय बाजारात सुद्धा या फळाला प्रचंड मोठी मागणी आहे.
हेही वाचा:-शरीरातील वाढते कोलेस्ट्रॉल करा कमी, दैनंदिन आहारात करा या पदार्थांचा समावेश.
गेल्या काही दिवसांपासून बाजारात ड्रॅगन फळाची आवक घटली आहे शिवाय बाजारात ड्रॅगन फ्रूट ची मागणी पण वाढलेली आहे त्यामुळं ड्रॅगन च्या दरात मोठी सुधारणा होऊ लागली आहे. सध्या बाजारात ड्रॅगन फळाला 120 ते 150 रुपये एवढा भाव मिळत आहे. परंतु आवक घटल्यामुळे बाजारात ड्रॅगन ची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शिवाय येत्या काही दिवसांमध्ये ड्रॅगन ची किंमत ही 20 te 40 तक्के एवढी वाढणार आहे.
बाजारात प्रचंड मागणी आणि मुबलक फायदा मिळत असल्याने आजकाल शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर ड्रॅगन ची लागण करत आहे. सध्या राज्यात अलीकडच्या काळात ड्रॅगन फ्रुटची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली असून सरासरी १ हजार टनांहून अधिक उत्पादन होते.
हेही वाचा:-राज्यात या जिल्ह्यात मिळतोय नवीन कापसाला 16 हजार रुपये भाव, वाचा सविस्तर
ड्रॅगन फ्रुटच्या हंगामाला सुरुवात ही एक जूनपासून होते. आणि अंदाजे 4 महिन्याच्या काळात म्हणजेच सर्वसाधारणपणे नोव्हेंबरअखेर ड्रॅगन फ्रुट बाजारपेठेत विक्री साठी तयार होतो . कोरोना सारख्या काळात या फळाला प्रचंड मागणी वाढली होती शिवाय हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते आणि शरीरातील रोग्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते. त्यामुळे कोरोना काळात अनेक डॉक्टर ड्रॅगन फ्रूट चे सेवन करण्याचा सल्ला देत. तसेच सणासुदीच्या काळात सुद्धा फळांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यामुळे ड्रॅगन फ्रूट च्या भावात वाढ होईल असे सांगितले जात आहे.
पांढरे ड्रॅगन फ्रुट :-125-130 रुपये प्रति किलो
लाल ड्रॅगन फ्रुट :- 180 रुपये प्रति किलो
Published on: 02 September 2022, 12:11 IST